(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
जळगाव:उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांची एका हिंदी वृत्त वाहिनीवर अफगणिस्तानातील सध्याच्या परीस्थीतीच्या मुद्यावरील मुलाखती दरम्यान वादग्रस्त विधान केल्याने जळगाव येथील नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात शायर मुनव्वर राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.अफगाणिस्तान देशावर तालिबान्यांनी ताबा घेतला असून या मुद्यावरून उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांची एका हिंदी वृत्त वाहिनीवर मुलाखत झाली. या मुलाखती दरम्यान त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने सर्व माध्यमांतून यावर टिका झाली.
त्यांनी महर्षी वाल्मिकी यांची तुलना तालिबानशी केल्याचे वादग्रस्त विधानाबाबत जळगाव येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जळगाव येथील शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुनव्वर राणा यांनी अनेक गझल्स प्रकाशित केल्या आहेत, त्यांच्या लेखनास एक वेगळी शैली आहे.परंतू ऑक्टोंबर २०२० मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांत राणा यांच्यावर धार्मिक गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देणारे वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर आता अफगणिस्तान तालिबानने ताब्यात घेतल्याने तालिबानचे समर्थन करीत असल्याचे एका हिंदी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत दिले आहे.