दहावी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरी!

Postal Life Insurance Mumbai Bharti 2023: तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मुंबई मध्ये एक नोकरीची खास संधी चालून आली आहे. टपाल जीवन विमा, मुंबई ( Postal Life Insurance) अंतर्गत भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत ‘अभिकर्ता’ पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहे. ‘टपाल जीवन विमा’ विभागाने नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन नियुक्ती केली जाणार आहे. या मुलाखती १६ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असून या पदांसाठीची पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती पाहूया…

‘टपाल जीवन विमा, मुंबई अभिकर्ता भरती २०२३’

पदाचे नाव: अभिकर्ता

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: मुंबई

(वाचा: Mahapareshan Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण’ मध्ये महाभरती! आजच करा अर्ज..)

वयोमर्यादा: कमीत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्त वयोमर्यादा नाही.

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

वेतन: ‘अभिकर्ता’ पदावर निवडल्या जाणार्‍या उमेदवारांना पोस्टाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन/भत्ता दिला जाईल. या पदासाठी नोकरीप्रमाणे वेतन नाही.

मुलाखतीचा पत्ता: प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७

मुलाखतीची तारीख: १६ ऑक्टोबर २०२३

या भरतीसंदर्भात भारतीय टपाल विभागाची अधिकृत वेबसाइट संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया: वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत प्रक्रिये द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला म्हणजे १६ ऑक्टोबर रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहणे गरजेचे आहे. कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेली आहेत. या मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा देणे गरजेचे आहे. परवाना परीक्षे नंतर त्यांना कामकाजाचे प्रशिक्षण दिले जाईल. उमेदवारांना तात्पुरता परवाना मिळवण्यासाठी ५० रुपये तर परीक्षेसाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागेल.

(वाचा: PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती! आजच करा अर्ज…)

Source link

Career NewsCareer News In MarathiGovernment jobindian post bharti 2023indian post recruitment 2023Job Newspostal life insurancePostal Life Insurance Mumbai Bharti 2023Postal Life Insurance Mumbai Recruitment 2023
Comments (0)
Add Comment