इंजिनियर्ससाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती; आजच करा अर्ज..

PGCIL Recruitment 2023: तुम्ही इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असेल आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंखी आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ या कंपनीमध्ये भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत ‘फील्ड पर्यवेक्षक’ इलेक्ट्रिकल आणि फील्ड पर्यवेक्षक – सिव्हिल’ या पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १६ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या,शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमार्यादा आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहूया.

‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पर्यवेक्षक भरती २०२३’ मध्ये पदे आणि पदसंख्या:
फील्ड पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) – १८
फील्ड पर्यवेक्षक (सिव्हिल) – ०२
एकूण पद संख्या – २० जागा

शैक्षणिक पात्रता:
फील्ड पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) – तंत्रशिक्षण विभागाच्या मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून तीन वर्षांचा पूर्णवेळ इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.

फील्ड पर्यवेक्षक (सिव्हिल) – तंत्रशिक्षण विभागाच्या मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून तीन वर्षांचा पूर्णवेळ सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.

(वाचा: ICSI CS Exam 2023: सुधारित अभ्यासक्रमावर आधारित पहिली ‘सीएस’ परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये; परीक्षेआधी प्रशिक्षणही मिळणार)

वेतन: २३ हजार आणि इतर भत्ते

वयोमार्यादा: कमाल वय २९ वर्षे

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ ऑक्टोबर 2023

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ‘पॉवरग्रिड’च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. शेवटच्या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरावी. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.

(वाचा: NIELIT Recruitment 2023: राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)

Source link

Career NewsGovernment jobjob for engineersJob NewsPGCIL bharti 2023PGCIL Recruitment 2023power grid corporation of indiaPower Grid Corporation of India recruitment 2023powergrid recruitmentpowergrid recruitment 2023
Comments (0)
Add Comment