नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Nashik Municipal Corporation Recruitment 2023: नाशिककरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती सुरू आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीमध्ये आरोग्य विभागातील जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ही आणि यासारखी अनेक संवर्गातील एकूण ९६ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

नाशिक महानगरपालिकेने नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती करिता ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २६ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.

‘नाशिक महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
जनरल सर्जन – ०२ जागा
फिजिशियन – ०४ जागा
स्त्रीरोगतज्ञ – ०५ जागा
बालरोगतज्ञ – ०५ जागा
रेडिओलॉजिस्ट – ०२ जागा
भूलतज्ञ – ०२ जागा
नाक कान घसा तज्ज्ञ – ०२ जागा
मानसोपचारतज्ज्ञ – ०१ जागा
दंतशल्य चिकत्सक – ०३ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – १० जागा
आयुष्य वैद्यकीय अधिकारी – २० जागा
स्टाफ नर्स – २० जागा
एएनएम – २० जागा
एकूण पदसंख्या – ९६

शैक्षणिक पात्रता:

  • जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ या पदांकरिता संबधित विषयातील एमडी/डीएनबी
  • दंतशल्य चिकत्सक या पदाकरिता बीडीएस
  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता एमबीबीएस
  • आयुष्य वैद्यकीय अधिकारी या पदांकरिता बीएएमएस
  • स्टाफ नर्स या पदाकरिता बीएससी नर्सिंग/ जीएनएम
  • एएनएम पदाकरिता एएनएम

(वाचा: PGCIL Recruitment 2023: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये १०० हून अधिक जागांसाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

वेतन:
जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ या पदांकरिता – ७५ हजार (मासिक)
दंतशल्य चिकत्सक या पदाकरिता – ३० हजार (मासिक)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता – ६० हजार (मासिक)
आयुष्य वैद्यकीय अधिकारी या पदांकरिता – ४० हजार (मासिक)
स्टाफ नर्स या पदाकरिता – २० हजार (मासिक)
एएनएम पदाकरिता – १८ हजार (मासिक)

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती: ऑफलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सार्वजनिक वैद्यकिय विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑक्टोबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नाशिक महानगर पालिका’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: MNC Nagpur Recruitment 2023: नागपूर महानगरपालिकेत भौगोलीक तज्ञ सल्लागारांची भरती; थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड)

Source link

government jobsJob Newsjobs in medical fieldnashik jobsnashik mahanagarpalika bharti 2023nashik mahanagarpalika recruitment 2023nashik mnc jobsNashik Municipal Corporation jobsnashik municipal corporation recruitmentNashik news
Comments (0)
Add Comment