‘एमपीएससी’ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागात ३७८ पदांची महाभरती! आजच करा अर्ज

MPSC Recruitment 2023: ‘एमपीएससी’ म्हणजेच ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ यांच्या द्वारे उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांसाठी काही महत्वाची पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालक आणि अधिव्याख्याता या पदांचा समावेश आहे.

एकूण ३७८ रिक्त जागांसाठी ही महाभरती होणार असून नुकतीच याबाबत ‘एमपीएससी’ कडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे असून ०९ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीप्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती घेऊया.

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग – उच्च व तंत्रशिक्षण विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
प्राध्यापक- ३२ जागा
सहयोगी प्राध्यापक – ४६ जागा
सहाय्यक प्राध्यापक / ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक – २१४ जागा
अधिव्याख्याता – ८६
एकूण रिक्त पदसंख्या – ३७८ जागा

पात्रता:

  • प्राध्यापक – या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराची संबधित विषयात पीएच.डी. असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त प्रकाशितामधून किमान १० रिसर्च पेपर प्रकाशित हवे आणि अध्यापनाचा १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • सहयोगी प्राध्यापक : या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराची संबधित विषयात पीएच.डी. असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त प्रकाशितामधून किमान ७ रिसर्च पेपर प्रकाशित हवे आणि अध्यापनाचा किमान ८ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक / ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक: या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे आणि नेट/ सेट परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • अधिव्याख्याता: या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी घेऊन पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच तो बी. एड. उत्तीर्ण असावा. (या व्यतिरिक्त सर्व पदांच्या सविस्तरपात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. सर्व पदांच्या अधिसूचनांची लिंक खाली जोडेलल्या आहेत.)

(वाचा: Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)

वयोमर्यादा:
प्राध्यापक – किमान १९ वर्षे कमाल ४५ वर्षे
सहयोगी प्राध्यापक – किमान १९ वर्षे कमाल ४५ वर्षे
सहाय्यक प्राध्यापक/ ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक – किमान १९ वर्षे कमाल ३८ वर्षे
अधिव्याख्याता – किमान १९ वर्षे कमाल ३८ वर्षे
(कमाल वयोमर्यादेत राखीव प्रवर्गाला ५ वर्षांची सवलत आहे)

अर्ज शुल्क:
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदासाठी अर्जशुल्क ७१९ रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ४४९ रुपये.
सहाय्यक प्राध्यापक / ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक आणि अधिव्याख्याता या पदासाठी ३९४ रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी २९४ रुपये.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण राज्यभरात

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ९ नोव्हेंबर २०२३

या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

प्राध्यापक पदाच्या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सहयोगी प्राध्यापक पदाच्या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सहाय्यक प्राध्यापक/ ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक पदाच्या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिव्याख्याता पदाच्या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: PGCIL Recruitment 2023: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये १०० हून अधिक जागांसाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

Source link

government jobsJob Newsmaharashtra public service commission latest newsMPSC Bharti 2023MPSC Recruitment 2023Technical Education Services Recruitment 2023उच्च व तंत्रशिक्षण विभाग भरती २०२३प्राध्यापक भरती
Comments (0)
Add Comment