उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; असा करा अर्ज

Ulhasnagar Municipal Corporation 2023 : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कामगार अधिकारी, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी, शाखा अभियंता पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ ठरवण्यात आली आहे.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त पदे : २२ जागा

कार्यकारी अभियंता (स्थापत्य / यांत्रिकी) : ०२ जागा
उप अभियंता (स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी) : ०५ जागा
कामगार अधिकारी (गट अ / ब) : ०१ जागा
आगार व्यवस्थापक (गट अ / ब) : ०१ जागा
सहाय्यक आगार व्यवस्थापक (गट अ / ब) : ०१ जागा
प्रशासकीय अधिकारी (आस्थापन विषयक) (गट अ / ब) : ०१ जागा
उद्यान अधिक्षक / उद्यान अधिकारी (गट अ / ब) Horticulture : ०१ जागा
शाखा अभियंता : १० जागा

(वाचा : Cochin Shipyard Limited मध्ये भरती, BE – BTech उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपयांत मासिक वेतन)

महत्त्वाचे :

  • उपरोक्त नमूद केलेल्या कामासाठी लागणारी विशेष अर्हता किंवा सबंधित कामाचा वर नमुद केल्याप्रमाणे किमान वर्षाचा अनुभव ही पूर्व अट ठेवण्यात येत आहे.
  • कामाचे स्वरूप आणि व्याप्ती विचारात घेऊन ते काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करून देण्यात येईल.
  • सादर कामासाठी करार पद्धतीने देण्या येनरी नियुक्ती एकावेळी जास्तीत-जास्त १ वर्ष कालावधीसाठी असेल.
  • करार पद्धतीने नियुक्ती करताना कममल वयोमर्यादा ही शासन निर्णयाप्रमाणे असावी.
  • अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यावर सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा.

उल्हासनगर महानगरपालिके अंतर्गत भरतीसाठी असा करा अर्ज :

1. या भरतीकरिता उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.

काही महत्वाच्या लिंक्स :

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीसाठी अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ९९५ जागांवर भरती, मिळणार १.४२ लाखांहून अधिक पगार)

Source link

government jobsulhasnagar managarpalika bharti 2023ulhasnagar managarpalika recruitment 2023ulhasnagar municipal corporation bharti 2023ulhasnagar municipal corporation jobs 2023उल्हासनगर महानगरपालिका नोकरी
Comments (0)
Add Comment