किरीट सोमय्यांच्या रडारवर आता छगन भुजबळ; मालमत्तेची केली पाहणी

हायलाइट्स:

  • भाजप नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावर
  • छगन भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी करणार
  • नव्या वादाला तोंड फुटणार का?

नाशिकः भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे आज नाशिक दौऱ्यावर असून ते पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या मालमत्तेची पाहणी करणार आहेत. त्यामुळं अनिल परब (Anil Parab) यांच्यानंतर आता छगन भुजबळ हे भाजपच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे.

मागील काही दिवसांपासून भाजप नेते व किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर आरोप करत होते. तसंच, महाविकास आघाडीतील इतर मंत्र्यांवरही सोमय्यांनी आरोप केले होते. त्यानंतर आज सोमय्या नाशिकमध्ये पोहचले आहेत.

‘ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही’

नाशिकमध्ये पोहोचताच किरीट सोमय्यांनी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीची पाहणी केली आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. किरीट सोमय्या हे नाशिकमध्ये भुजबळांच्या मालमत्तेची चौकशी पाहणी करणार असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोमय्यांनी छगन भूजबळ यांच्या मालमत्तेवर प्राप्तीकर विभागानं कारवाई केल्याचा दावा केला होता. मात्र, त्यावर भुजबळ यांनी हे आरोप फेटाळून लावत अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज किरीट सोमय्या हे नाशिकमध्ये असून भुजबळांच्या मालमत्तेची चौकशी करणार आहेत. त्यामुळं आता छगन भुजबळ आता सोमय्यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

नाशिक महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपनंही आगामी निवडणुकींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळं किरीट सोमय्यांचा हा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

… तर हजारो कार्यकर्ते पंचगंगेत जीव देतील; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Source link

chhagan bhujbalKirit Somaiyakirit somaiya vs chhagan bhujbalकिरीट सोमय्याछगन भुजबळ
Comments (0)
Add Comment