‘सालार’च्या बॉक्स ऑफिसची गाडी भरकटली? १२ व्या दिवशी झाली सर्वात कमी कमाई

मुंबई– प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे. हा चित्रपट साऊथच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला आहे. प्रशांत नीलच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यावेळी बॉलिवूड आणि साऊथच्या दोन आघाडीच्या कलाकारांचा चित्रपट एकत्र प्रदर्शित झाला त्यामुळे या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चुरशीची स्पर्धा रंगली.

‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून काय म्हणाले प्रेक्षक?

ओपनिंगच्या दिवशी जुगलबंदी टाळण्यासाठी हा चित्रपट अगदी एका दिवसाच्या गॅपने रिलीज झाला. या निर्णयाचा फायदा ‘सालार’ला नक्कीच मिळाला. ‘डंकी’च्या एका दिवसानंतर, २२ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात १५८.१० कोटी रुपयांची बंपर कमाई केली. पण आता १२ दिवसांनी चित्रपटाच्या कमाईत घसरण सुरू झाली असून मंगळवारी चित्रपटाने सर्वात कमी कमाई केली.

बाहुबलीनंतर प्रभास बॉक्स ऑफिस यशाच्या प्रतिक्षेत होता. कारण ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि अलीकडच्या ‘आदिपुरुष’ सारखे चित्रपट लोकांच्या पसंतीस पडले नाहीत. ‘आदिपुरुष’मुळे त्याला भरपूर ट्रोलही केले गेले. अखेरीस ‘सलारा’ रिलीज झाल्यावर प्रभासची भरकटलेली करिअरची गाडी रुळावर आणली.

शूरा खानशी लग्नानंतर अरबाजने Ex पत्नी मलायकाला केले अनफॉलो! इतका वाढला दुरावा
गेल्या वर्षीचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट

पहिल्याच दिवशी ९०.७ कोटींची कमाई करणारा ‘सालार’ भारतीय बॉक्स ऑफिसवर गेल्या वर्षीचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने नवीन वर्षातही भरपूर कमाई केली पण पहिल्या मंगळवारी म्हणजेच १२ व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली. या दिवशी ‘सालार’ सालारने ७.५० कोटी कमावले. तर एकूण कमाई ३६९.३७ कोटींची आहे.

आमिरच्या लेकीच्या लग्नाला ९०० जणांना आमंत्रण, रिसेप्शनच्या ठिकाणाचे प्रियांका चोप्राशी खास कनेक्शन
जगभरात आतापर्यंत ५६५ कोटींहून अधिक कलेक्शन झाले

या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ५६५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. ११ दिवसांत ५५७.०० कोटी रुपये गोळा केले आणि परदेशात १३०.०० कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने भारतात ४२७.०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Source link

dunki movieprabhas moviesalaar box office collectionsalaar movieडंकी सिनेमाप्रभास सिनेमासालार बॉक्स ऑफिस रिपोर्टसालार सिनेमा
Comments (0)
Add Comment