डोनाल्ड ट्रम्प यांना अडचणीत आणणारे ‘हश मनी’ प्रकरण नेमकं काय? प्रकरणातील महत्त्वाचे चेहरे कोणते?

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अडचणीत आणणाऱ्या हश मनी प्रकरणात नुकत्याच काही साक्षी नोंदवण्यात आल्या. या प्रकरणाबद्दल…

काय आहे प्रकरण?

अमेरिकेचे माजी अध्यक्ष ‘हश मनी’ प्रकरणात अडचणीत आले आहेत. या प्रकरणात न्यायालयात साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल आणि मॉडेल व अभिनेत्री केरन मॅकडोगल यांच्यासोबतचे संबंध दडवण्यासाठी ट्रम्प यांनी पैसे दिल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांनी हे आरोप नाकारले आहेत.

ट्रम्प यांची न्यायालयावर टीका

‘हश मनी’ प्रकरणावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालय ‘कांगारू कोर्ट’ असल्याची टीका केली आहे. याशिवाय स्टॉर्मी डॅनियल आणि ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन नीच असल्याची टीकाही ट्रम्प यांनी केली होती. या प्रकरणात साक्षीदार, न्यायालयीन कर्मचारी आणि त्यांचे नातेवाइक यांच्यावर टीका करण्यास ट्रम्प यांच्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. फौजदारी खटला सुरू असलेले ट्रम्प पहिले अमेरिकेचे माजी अध्यक्ष ठरले आहेत. या प्रकरणात ते दोषी ठरले, तर त्यांची अध्यक्षपदाची उमेदवारी अडचणीत येऊ शकते.

प्रकरणातील महत्त्वाचे चेहरे
स्टॉर्मी डॅनियल्स

स्टॉर्मी डॅनियल्स पॉर्न स्टार असून, सन २००६मध्ये ट्रम्प यांनी तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते; तसेच या संबंधांची वाच्यता करू नये यासाठी ट्रफ यांनी पैसे दिल्याचा जाहीर आरोप स्टॉर्मीने केला आहे. ट्रम्प यांनी असे संबंध असल्याचे नाकारले आहे.

कॅरन मॅकडोगल
मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या कॅरन मॅकडोगलचे २००६मध्ये ट्रम्प यांच्याशी अनैतिक संबंध होते. त्याबद्दल वाच्यता करू नये यासाठी कॅरन हिला दीड लाख डॉलर देण्यात आल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांनी हे संबंध असल्याचेही नाकारले आहे.

मटा ग्राऊण्ड रिपोर्ट : सट्टेबाजांच्या गावात लोकसभेची ‘हवा’, यंदा देशात कुणाची सत्ता? निकालाचा अंदाज
मायकेल कोहेन
मायकेल कोहेन हे डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी वकील होते. ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणूक प्रचारमोहिमेच्या अखेरच्या दिवसांत २०१६मध्ये स्टॉर्मी डॅनियलला पैसे देण्यास मला सांगितले होते, असा दावा कोहेन यांनी केला आहे. ट्रम्प यांनी हा आरोपदेखील फेटाळून लावला आहे.

यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे; बजरंग सोनवणेंचं मुंडेंना सडेतोड उत्तर

डेव्हिड पेकर
डेव्हिड पेकर हे ‘नॅशनल एन्क्वायरर’ या माध्यमाचे माजी प्रकाशक आहेत. स्टॉर्मी डॅनियलशी व्यवहार करण्यासाठी त्यांनी दलालास मदत केली होती; तसेच ट्रम्प आणि केरन मॅकडोगल यांच्या संबंधांचे वृत्त विकत घेऊन नष्ट केले होते. अमेरिकी तपास यंत्रणांनी पेकर यांना माफीचा साक्षीदार केले आहे. पेकर यांची या प्रकरणी न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली आहे.

Source link

David Packerdonald trumphush money caseKaren MacDougallMichael CohenStormy Daniels
Comments (0)
Add Comment