केंद्र सरकार काही राज्यांना न मागता हजारो कोटींचे पॅकेज देते; अजित पवारांची नाराजी

हायलाइट्स:

  • मुसळधार पावसामुळं राज्यात शेतीचं मोठं नुकसान
  • शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं अजित पवारांचं आश्वासन
  • केंद्र सरकारकडूनही व्यक्त केली मदतीची अपेक्षा

मुंबई: महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानाबद्दलची निश्चित माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. (Ajit Pawar Targets Central Government over Relief to States)

अतिवृष्टीसोबतच काही भागातील धरणांचे पाणी सोडल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक संकट आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या शेतकरी वर्ग, लोकप्रतिनिधींकडून करण्यात येतात. राज्य सरकारकडे अनेकांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीकविम्याचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

वाचा: ‘शेतकऱ्यांना मदत करा हे सांगायला भाजप कशाला हवा?’

राज्यसरकार संपूर्ण माहिती गोळा करत आहे. आकडे प्राप्त झाल्यानंतर सरकार निर्णय घेईल. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष पाहून मदत करण्याची आमची भूमिका आहे. सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रशासनाला योग्य ते निर्देश देत आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

वाचा:अनिल देशमुख प्रकरणी ईडीचा फेरा मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांपर्यंत

केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करताना शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अंदाज घेऊन मागणी केली जाते. मात्र किती मदत द्यायची हा सर्वस्वी केंद्राचा निर्णय आहे. काही काही राज्यांना केंद्राने न मागता स्वतःहून हजारो कोटींचे पॅकेज दिले होते. केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यासोबत दुजाभाव न करता मदत दिली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

वाचा: किरीट सोमय्या आज राज्यपालांना भेटणार; राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…

Source link

ajit pawarAjit Pawar on Farmer ReliefAjit Pawar targets Central Governmentgulab cycloneअजित पवारगुलाब चक्रीवादळ
Comments (0)
Add Comment