PM Modi to Meditate In Kanyakumari :पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील कन्याकुमारीत ध्यान! जाणून घ्या हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Vivekananda Rock Memorial :

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्याचा प्रचार ३० मेरोजी संपत आहे. हा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू येथील कन्याकुमारीला जातील आणि तेथील विवेकानंद शिला स्मारकात ध्यान करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ध्यानमंडपात ३० मेरोजी सायंकाळपासून ते १ जूनच्या सायंकाळापर्यंत दिवसरात्र ध्यान करतील.
याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी तीन दिवस ध्यानधारणा केली होती, आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते. गेल्या निवडणुकीत प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान शंभोमहादेवाच्या चरणी केदरनाथला पोहोचले होते. तर या वेळी ते माता पार्वतीच्या शरणाला जात आहेत. माता पार्वती ही विजयाची देवता आहे. जाणून घेऊ या, हे तीर्थक्षेत्र का प्रसिद्ध आहे.

1. विवेकानंदाच्या विचारातून प्रेरणा

पंतप्रधान मोदी यांना स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी नेहमीत प्रभावित केले आहे, आणि ते विवेकानंदांच्या विचारातून प्रेरणा घेतात. पंतप्रधानांनी विविध व्यासपीठांवरून स्वामी विवेकानंदाच्या समर्पित जीवनाचा उल्लेख केलेला आहे, तसेच पाश्चात्य देशांना स्वामी विवेकानंदांनी कशा प्रकारे अद्वैतवाद समजावून सांगितला, याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी विवेकानंद स्मारकातील ध्यानमंडपात ३० मे रोजी सायंकळपासून ते १ जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यानधारण करतील. यापूर्वी याच खडकावर स्वामी विवेकानंदांनी ३ दिवस ध्यानधराणा करून विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते.

2. विवेकानंदांनी केली होती ३ दिवस ध्यानधारणा

या ठिकाणाचे स्वामी विवेकानंदांच्या जीवनात फार मोठे महत्त्व आणि प्रभाव आहे. ज्या पद्धतीने गौतम बुद्धांच्या जीवनात सारनाथचे विशेष स्थान आहे आणि तेथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती, तसेच कन्याकुमारीतील या ठिकाणचे स्वामी विवेकानंदांच्या जीवनात स्थान आहे. स्वामी विवेकानंदानी देशभ्रमंती केल्यानंतर २४ डिसेंबर १८९२ला स्वामी विवेकानंद येथे पोहोचले होते, त्यानंतर २५ ते २७ डिसेंबर या कालावधित त्यांनी या खडकावर ध्यानधारणा केली होती. या ठिकाणी आता त्यांचा पुतळा आहे.

3. कन्याकुमारीत आहे रहस्यमय शक्तिपीठ

या ठिकाणीची ओळख श्रीपद पराई अशी आहे. धार्मिक मान्यता अशी आहे की देवी पार्वतीने येथे एका पायावर भगवान शिवाची प्रतीक्षा केली होती. या ठिकाणी कुमारी देवीचे पावलांचे ठसेही आहेत. हे ठसे विवेकानंद शिला स्मारकाच्या समोर आहेत. कन्याकुमारीत कन्या आश्रम स्थळी एक शक्तिपीठ आहे, जेथे माता सतीचा पृष्ठभाग पडला होता. काही विद्वानांचे म्हणणे असे आहे की, येथे मातेचा ऊर्ध्व दात पडला होता. या शक्तिपीठाला शक्ती सर्वाणि आणि शिव यांचे निमिष मानले जाते. कन्याश्रमाला कालिकशराम किंवा कन्याकुमारी शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. हे शक्तिपीठ एका बेटावर आहे, याच्या चारी बाजूंनी पाणी आहे. येथील दृश्य अतिशय रमणीय आहे. येथ दर्शन घेतल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

4. अशी आहे पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने दैत्य वाणासुरला वरदान दिले होते. या वरदानानुसार एखाद्या कुमारिकेशिवाय त्याचा वध कोणीच करू शकणार नव्हते. राजा भरतच्या ८ मुली आणि एक मुलगा होता. भरताने आपले साम्राज्य ९ भागात विभाजित करून आपल्या मुलांत वाटून दिले. दक्षिणेतील हा भाग मुलगी कुमारीला मिळाला होता. कुमारीही शिवभक्त होती आणि तिला भगवान शिवासोबत विवाह करायचा होता. विवाहाची तयारी सुरू होतील, पण नारद मुनींची इच्छा होती की कुमारीच्या हाताने वाणासुराचा वध झाला पाहिजे. त्यामुळे कुमारी आणि भगवान शिव यांचा विवाह होऊ शकला नाही. त्यामुळे या स्थानाचे नाव पडले

5. कन्याकुमारी

कुमारीला देवी शक्तीचा अंश मानला जातो. वाणासुराचा वध केल्यानंतर दक्षिण भारतातील या स्थानाचे नाव कन्याकुमारी पडले. समुद्रकिनारी कुमारी देवीचे मंदिर आहे. येथे माता पार्वतीची कन्या रूपात पूजा केली जाते. या मंदिरात पुरुषांना प्रवेश करायचा असेल तर कमरेच्या वरील कपडे काढून ठेवावे लागतात. विवाहसंपन्न न झाल्याने राहिलेले तांदूळ खडे बनले. येथील समुद्राच्या किनारी रेतीत डाळ आणि तांदळाच्या आकाराचे खडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

Source link

Kanyakumari Narayani ShaktipeethMeditationPM ModiVivekananda Rock Memorialध्यानधारणापंतप्रधान नरेंद्र मोदीस्वामी विवेकानंद यांचे विचारहर हर महादेव
Comments (0)
Add Comment