Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Maharashtra Vidhan Sabha Election - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 21 Nov 2024 09:08:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Maharashtra Vidhan Sabha Election - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान https://tejpolicetimes.com/?p=109641 https://tejpolicetimes.com/?p=109641#respond Thu, 21 Nov 2024 09:08:20 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109641 जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान

Maharashtra Assembly Election 2024: शनिवारी (दि. २३) मतमोजणीनंतर त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाड़ी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती आहेत. महाराष्ट्र टाइम्सjalgaon vote म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी अकरा मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६०.३७ टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक मतदान रावेर मतदारसंघात ६२.५०, तर सर्वात कमी […]

The post जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान

Maharashtra Assembly Election 2024: शनिवारी (दि. २३) मतमोजणीनंतर त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाड़ी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
jalgaon vote

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी अकरा मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६०.३७ टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक मतदान रावेर मतदारसंघात ६२.५०, तर सर्वात कमी मतदान जळगाव शहर मतदारसंघात ४५.११ टक्के मतदान झाले.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शेवटची मतदान टक्केवारी मोजली जात होती. सायंकाळी काही केंद्रांवर मतदान सुरू होते. जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांतील १३९ उमेदवारांचे भाग्य बुधवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी (दि. २३) मतमोजणीनंतर त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाड़ी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील उपशिक्षक अनवर्देबुधगांव (वय ४९) हे मतदान (बीएलओ) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज ता. शिरपूर मूळगावी परत जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दृष्टिक्षेपात निवडणूक…. • मतदारसंघ – ११ ■ उमेदवार – १३९ पक्षीय उमेदवार- ३६ • मतदार ३६,७८,११२ मतदान कट – ३,६८३
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ६३ टक्के मतदान; वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा
नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान
धुळे :
नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांतील एकूण १४३४ मतदान केंद्रांवर बुधवारी, सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ७५ टक्के मतदान झाले. नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७४.६५, तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी ५६ टक्के मतदान झाले आहे. चार विधानसभा मतदारसंघांत ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात नंदुरबार व शहादामध्ये दुहेरी, नवापूरमध्ये तिरंगी, तर अक्कलकुवामध्ये चौरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे.
आधी मतदान, मग लग्न! मतदान केल्यानंतरच नवरी चढली बोहल्यावर, नागपूरच्या नेहाचं सर्वत्र कौतुक
धुळे जिल्ह्यात मतदारांचा उत्साह
धुळे :
धुळे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाकडून दाखवलेला मतदानाचा उत्साह यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. शहरातील ८० फुटी रोडवरील ऍग्लो ऊर्दू हायस्कूल, शंभर फुटी रोडवरील हाजी साजदा बानो हायस्कूल, देवपूर परिसरातील एलएम सरदार उर्दू हायस्कूल, महापालिका शाळा क्र. चार, आठ, नऊ, पंचवीस यासह श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल, गरुड इंग्रजी स्कूल, कनोसा हायस्कूल, गिदोडिया हायस्कूल या ठिकाणी मुस्लिम महिला व पुरुषांची मतदानासाठी मोठी रांग सकाळपासूनच लागलेली दिसून आली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109641 0
काळा चष्मा, काळी टोपी, सोबत गाड्यांचा ताफा; कडेकोट पोलीस बंदोबस्तात सलमान खानने केले मतदान https://tejpolicetimes.com/?p=109520 https://tejpolicetimes.com/?p=109520#respond Wed, 20 Nov 2024 13:53:58 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109520 काळा चष्मा, काळी टोपी, सोबत गाड्यांचा ताफा; कडेकोट पोलीस बंदोबस्तात सलमान खानने केले मतदान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2024, 7:23 pm महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी आज (२० नोव्हें.) मतदान पार पडले. सामान्य नागरिकांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने देखील मतदानाचे कर्तव्य पार पाडले. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर सलमान खानने मतदान केले. काळी टोपी, काळा चष्मा आणि राखाडी रंगाचा टी-शर्ट घालून सलमानने मतदान […]

The post काळा चष्मा, काळी टोपी, सोबत गाड्यांचा ताफा; कडेकोट पोलीस बंदोबस्तात सलमान खानने केले मतदान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
काळा चष्मा, काळी टोपी, सोबत गाड्यांचा ताफा; कडेकोट पोलीस बंदोबस्तात सलमान खानने केले मतदान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2024, 7:23 pm

महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी आज (२० नोव्हें.) मतदान पार पडले. सामान्य नागरिकांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने देखील मतदानाचे कर्तव्य पार पाडले. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर सलमान खानने मतदान केले. काळी टोपी, काळा चष्मा आणि राखाडी रंगाचा टी-शर्ट घालून सलमानने मतदान केले. यावेळी त्याच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला.

Source link

The post काळा चष्मा, काळी टोपी, सोबत गाड्यांचा ताफा; कडेकोट पोलीस बंदोबस्तात सलमान खानने केले मतदान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109520 0
‘आता शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही,’ लक्ष्मण हाकेंचा निर्धार, जरांगेंप्रमाणेच ‘पाडण्याचे अस्त्र’ उगारले https://tejpolicetimes.com/?p=108536 https://tejpolicetimes.com/?p=108536#respond Wed, 13 Nov 2024 11:22:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108536 ‘आता शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही,’ लक्ष्मण हाकेंचा निर्धार, जरांगेंप्रमाणेच ‘पाडण्याचे अस्त्र’ उगारले

Laxman Hake atrtack on Sharad Pawar: लक्ष्मण हाकेंनी आज पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. आम्ही एकवेळ भाजपला मतदान करु, मात्र शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही, असा निर्धार हाकेंनी बोलून दाखवला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या वेळी जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगेंचा मराठा फॅक्टर काम करणार असल्याचे वातावरण आहे. […]

The post ‘आता शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही,’ लक्ष्मण हाकेंचा निर्धार, जरांगेंप्रमाणेच ‘पाडण्याचे अस्त्र’ उगारले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘आता शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही,’ लक्ष्मण हाकेंचा निर्धार, जरांगेंप्रमाणेच ‘पाडण्याचे अस्त्र’ उगारले

Laxman Hake atrtack on Sharad Pawar: लक्ष्मण हाकेंनी आज पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. आम्ही एकवेळ भाजपला मतदान करु, मात्र शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही, असा निर्धार हाकेंनी बोलून दाखवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या वेळी जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगेंचा मराठा फॅक्टर काम करणार असल्याचे वातावरण आहे. यातच राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी चित्र निर्माण झाले आहे. जरांगेंच्या राजकीय भूमिकेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली आहे. तर जरांगेंच्या मागे शरद पवारांचा हात असल्याचेही हाकेंनी वारंवार म्हटले. लक्ष्मण हाकेंनी आज पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. आम्ही एकवेळ भाजपला मतदान करु, मात्र शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही, असा निर्धारच हाकेंनी बोलून दाखवला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, ‘जिथे वंचितचा उमेदवार नाही, ओबीसी आरक्षणाच्या विचाराचा उमेदवार नाही. तिथे आम्ही एकवेळेस भाजपला मतदान करु. मात्र, शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांचे आंदोलन मोठे केले.’ यासोबतच ‘ओबीसी समाज यावेळेला महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला विधानसभेला घेणार. यावेळी भलेभले तुतारीचे उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाहीत,’ अशा शब्दांत लक्ष्मण हाकेंनी हुंकार भरला आहे.
Ajit Pawar: दादांना ‘शरद पवार पॅटर्न’ची भुरळ, लोकसभेत गाजलेला फॉर्म्युला वापरणार; बंपर यश मिळणार?
तर ‘देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहावी. मराठा समाजातील तरुणांना रोजगार दिले असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हायला विरोध का? फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध का? असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

तर लक्ष्मण हाकेंनीा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष भूषण सिंह होळकर यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, होळकरांचे वंशज म्हणून कोणालाही पवार सध्या उभे करीत असून रोहित पवार व प्रवीण गायकवाड यांच्या स्क्रिप्टवर चालणारा बाहुले आहेत. होळकरांचे वंशज अमेरिकेपासून रॉयल फॅमिली आहे. ती असल्या राजकारणापासून लांब राहतील असेही लक्ष्मण हाके म्हणाले. य़ावर आता शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

लोकसभा निवडणुकीआधी मराठा आंदोलन पेटले होते. आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्याने जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना घेरले होते. त्याच प्रमाणे मराठा आरक्षणाला होणारा विरोध पाहता ओबीसी नेत्यांना देखील धारेवर धरले. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण झाला. परिणामी महायुतीला मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन्ही समाजाचे नेते समोरासमोर आल्याने नेमका राजकारणावर परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘आता शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही,’ लक्ष्मण हाकेंचा निर्धार, जरांगेंप्रमाणेच ‘पाडण्याचे अस्त्र’ उगारले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108536 0
लातूर मतदारसंघात अटीतटीची लढत; देशमुख, पाटील की उदगीरकर, कोण मारणार बाजी? https://tejpolicetimes.com/?p=108328 https://tejpolicetimes.com/?p=108328#respond Tue, 12 Nov 2024 10:34:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108328 लातूर मतदारसंघात अटीतटीची लढत; देशमुख, पाटील की उदगीरकर, कोण मारणार बाजी?

Latur Assembly Constituency: लातूर मतदारसंघाची राज्यात कायमच चर्चा होत असते. दोन वेळा मुख्यमंत्री दिलेला मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. महाराष्ट्र टाइम्सlature लातूर: शहर मतदारसंघात काँग्रेसचे अमित देशमुख, भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे नरसिंह उदगीरकर यांच्यात अटीतटीची लढत आहे. मतदारसंघातील विविध प्रश्न आणि पूर्णत्वास गेलेल्या विकासकामांची मांडणी करीत उमेदवारांनी प्रचाराला वेग […]

The post लातूर मतदारसंघात अटीतटीची लढत; देशमुख, पाटील की उदगीरकर, कोण मारणार बाजी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लातूर मतदारसंघात अटीतटीची लढत; देशमुख, पाटील की उदगीरकर, कोण मारणार बाजी?

Latur Assembly Constituency: लातूर मतदारसंघाची राज्यात कायमच चर्चा होत असते. दोन वेळा मुख्यमंत्री दिलेला मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे.

महाराष्ट्र टाइम्स
lature

लातूर: शहर मतदारसंघात काँग्रेसचे अमित देशमुख, भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे नरसिंह उदगीरकर यांच्यात अटीतटीची लढत आहे. मतदारसंघातील विविध प्रश्न आणि पूर्णत्वास गेलेल्या विकासकामांची मांडणी करीत उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. लातूर मतदारसंघाची राज्यात कायमच चर्चा होत असते. दोन वेळा मुख्यमंत्री दिलेला मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पण, लढत तिरंगी होणार आहे. या मतदारसंघात चार लाख १४५ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार दोन लाख पाच हजार ६३६ असून, एक लाख ९४ हजार ३७८ स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी ३० आणि १११ सैनिक मतदार आहेत. एकूण ३८९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारसंघाला लातूर महानगरासह लातूर तालुक्यातील २७ गावांचा समावेश आहे. ही रचना राजकीय समीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. १९७२ पासून लातूरला मंत्रीपद मिळत गेले आहे. शिवराज पाटील चाकूरकर पहिल्यावेळी निवडून आले होते. त्या वेळी ते उपमंत्री आणि नंतर उपसभापती झाले. सन १९८० पासून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द बहरली. मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. सर्वाधिक काळ देशमुख कुटुंबाचा आहे. फक्त १९९५मध्ये शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी देशमुखांना धक्का दिला होता. शहर विकासकामात रोजगाराचा विचार कमी झाला आणि भव्य शासकीय इमारती, खासगी रुग्णालये, आणि खासगी शिकवणी वर्गाची रेलचेल वाढली. त्यामुळे लातूर शहर महाराष्ट्राचे ‘कोटा’ ठरले आहे.

विलासराव देशमुख यांनी दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यावेळी लातूरचा सुवर्णकाळ मानला गेला. त्यानंतर किरकोळ विकासकामांनाही गती मिळाली नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख, भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके रिंगणात आहेत. नऊ उमेदवार राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील नोंदणीकृत पक्षाचे आहेत. अकरा अपक्ष उमेदवार आहेत. त्यात काँग्रेसचे महापौर राहिलेले आणि नंतर भाजपमध्ये गेलेले अख्तरमिया जलाल शेख आणि ‘आप’चे पदाधिकारी अश्विन नलबले यांचा समावेश आहे. ‘वंचित’चे उमेदवार विनोद खटके यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले आहे.
नाशिक हादरलं! मामाच्या घरात भाचीने कवटाळलं मृत्यूला; नववीतील विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, काय घडलं?
भाजपच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या सून आहेत. त्यांच्या उमेदवारीने उच्चशिक्षित आणि उत्तम राजकीय उमेदवाराची चर्चा सुरू झाली आहे. अमित देशमुख नियोजनात वाकबगार आहेत. त्यांना मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करायचा असल्यामुळे त्यांनी व्यापारी, मित्र, उद्योजक यांच्या भेटी घेऊन लातूरची मांडणी केली आहे. लातूरात मुद्यापेक्षा वावड्या भारी ठरतात. त्या कधी संदर्भासह, कधी तार्किक अंदाजावर आधारलेल्या असतात. एखादी वावडी गेमचेंजर ठरते असा या मतदारसंघाचा इतिहास आहे.
कलम ३७०चं काय सांगता, सोयाबीनच्या भावाचे आधी सांगा! उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका
लोकसभेचा परिणाम होणार ?
लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि सध्या काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुधाकर शृंगारे यांना लातूर शहर मतदारसंघात ९४ हजार ९७४ मते मिळाली होती. काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांना एक लाख २४ हजार ९०८ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांना सात हजार ७४३ मते मिळाली होती. पुढील काळात कोणाच्या सभा प्रभावी ठरणार आणि कोणते मुद्दे परिणामकारक होणार याची उत्सुकता आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post लातूर मतदारसंघात अटीतटीची लढत; देशमुख, पाटील की उदगीरकर, कोण मारणार बाजी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108328 0
विधानसभेच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसी वादाच्या फेऱ्यात, अधिसूचनेवरुन शिवसेना भाजप आमने-सामने https://tejpolicetimes.com/?p=104473 https://tejpolicetimes.com/?p=104473#respond Thu, 05 Sep 2024 07:29:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104473 विधानसभेच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसी वादाच्या फेऱ्यात, अधिसूचनेवरुन शिवसेना भाजप आमने-सामने

Shivsena BJP Controversy over Mirya MIDC: कोकणात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धूमधडाका लावला आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसीच्या अधिसूचनेवरुन शिवसेना भाजपमध्ये रणकंदन सुरू झाले आहे. Lipi प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघात […]

The post विधानसभेच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसी वादाच्या फेऱ्यात, अधिसूचनेवरुन शिवसेना भाजप आमने-सामने first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विधानसभेच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसी वादाच्या फेऱ्यात, अधिसूचनेवरुन शिवसेना भाजप आमने-सामने

Shivsena BJP Controversy over Mirya MIDC: कोकणात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धूमधडाका लावला आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसीच्या अधिसूचनेवरुन शिवसेना भाजपमध्ये रणकंदन सुरू झाले आहे.

Lipi
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धूमधडाका लावला आहे. यातच निवडणुका तोंडावर असताना शिवसेना भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी ‘चला रत्नागिरीचा विकास करूया’ असा नारा देत रत्नागिरी फोरमची स्थापना केली आहे, या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे उदय सामंत यांना शह देण्यासाठी उघडपणे भूमिका घेतल्याचे दिसते. रत्नागिरी येथील मिऱ्या एमआयडीसीवरून भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी ‘मला प्रसंगी पक्ष सोडावा लागला तरी चालेल’ अशी उघडपणे सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. ‘मिऱ्या एमआयडीसी भूसंपादनाच्या नोटिसा बजावणारे सरकार बदललं की, नोटीस रद्द होतील’ अशा स्वरूपाचे खळबळजनक विधान करत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

भाजपाचे माजी आमदार बाळा माने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिऱ्या एमआयडीसीच्या भूसंपादनाबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र पाठवलं होतं. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने बाळ माने यांच्या मनात नेमकं चाललंय काय? अशाही चर्चा रंगल्या आहेत.

बाळ माने यांची आक्रमक भूमिका

मिऱ्या एमआयडीसी वरून शिवसेना भाजपमध्ये रणकंदन सुरू झाले आहे. चार दिवसांपूर्वी मिऱ्या ग्रामस्थांची ग्रामदेवतेच्या मंदिरात बैठक घेऊन बाळ माने यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. येथे कोणते उद्योग येणार आहेत, काय होणार आहे, कोण उद्योजक आहेत, हे त्यांच्याजवळ बसून केवळ आम्ही ग्रामस्थच ठरवू. मात्र एमआयडीसीने अधिसूचना काढून ग्रामस्थांना नोटीसा बजावू नयेत व ग्रामस्थांनी त्या नोटिसा स्वीकारू नयेत आणि स्वीकारल्या तरी काही फरक पडत नाही, असा आदेशच दिला आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलेल आणि आपलं सरकार येईल किंवा कोणतंही येऊद्यात नोटिसा बजावणारे हे सरकार बदललं की नोटिसा रद्द होतील, असेही सूचक विधान बाळ माने यांनी केलं आहे. एक प्रकारे मिऱ्या एमआयडीसी अधिसूचना रद्द करा असा अन्यथा तशीच काही वेळ आली तर प्रसंगी मी पक्ष सोडण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असं ग्रामसभेत सांगत भाजप पक्षश्रेष्ठीनाही सूचक इशारा दिला आहे.
जयदीप आपटेंना बॉसही वाचवू शकला नाही, अटकेच्या ८ दिवसाआधीच ठाण्यातून जामिनाची तयारी, संजय राऊत यांचा आरोप
तसेच बाळ माने यांनी ‘आमचं सरकार आहे, सरकारमध्ये आमचे १०५ आमदार आहेत त्यामुळे ४० आमदारांमध्ये समावेश असलेल्यांनी आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय याबद्दल परस्पर निर्णय घेऊ नये, असे म्हणत एकप्रकारे मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मिऱ्या एमआयडीसीवरून वातावरण तापले आहे. तर ‘लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली विकासाचे जे स्वप्न दाखवले जाणार आहे, ते आम्हाला नको आहे. आमचा विकास करताना परस्पर कोणतेही उद्योग करू दिले जाणार नाहीत, अशी विरोधी भूमिका घेत माने यांनी तुम्हाला विकास करायचा आहे. तर तो भगवती बंदराचा करा, असेही मानेंनी सरकारला सुचवले आहे.

जोर जबरदस्तीने एमआयडीसी होणार नाही- उदय सामंत

दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अलीकडे झालेल्या एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले की, जर का कोणाला एमआयडीसी नको असेल तर जोर जबरदस्तीने केली जाणार नाही आणि आम्हाला असे एमआयडीसी करण्याची गरजही नाही. यामध्ये जणू काही उदय सामंत जमिनी घेऊन येथे महाल बांधणार आहे, अशा स्वरूपाचे उद्योग निवडणुकीच्या तोंडावर काही जणांकडून सुरू आहेत. मिऱ्या येथील आमच्या जमिनी घ्या, असं सांगायला माझ्याकडे कोण आलं होतं? असं सांगितलं तर यांची पळता भुई थोडी होईल, अधिसूचना निघाली म्हणजे त्याठिकाणी एमआयडीसी झाली, असं होत नाही, असा उदय सामंत यांनी बाळ मानेंवर पलटवार केला. तसेच रत्नागिरीतील पर्यटन उद्योगाला चालना मिळावी, रोजगार निर्मिती गावातच व्हावी, या उद्देशाने आपली मिऱ्या एमआयडीसी बाबत भूमिका असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

मिऱ्या एमआयडीसीची अधिसूचना

राजापूर पाठोपाठ मिऱ्या येथील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. यासाठी मिऱ्या येथील खाजगी क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१चे प्रकरण ६ च्या तरतूदी लागू केल्या आहेत. सदरचे क्षेत्र कलम २ खंड (ग) नुसार अधिसूचित करण्याचा प्रस्तावास अधिनियमाच्या कलम ३२(१) पुर्वी खालील अटीच्या अधीन राहून क्षेत्र अधिसूचित करण्यास शासन मंजूरी दिली आहे. या जागेवर विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असून हे लॉजिस्टिक पार्क म्हणून विकसित होणार आहे, तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी मीडिया परिसरात जमीन अधिग्रहण करून एमआयडीसीचा प्रस्ताव असला तरीही यावरून वातावरण तापले आहे. आता बाळ माने यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र शासन कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post विधानसभेच्या तोंडावर मिऱ्या एमआयडीसी वादाच्या फेऱ्यात, अधिसूचनेवरुन शिवसेना भाजप आमने-सामने first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104473 0
Vidhan sabha : राज्यात मोदींचा तिसरा दौरा, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सभा; भाजपकडून तयारी सुरु https://tejpolicetimes.com/?p=104384 https://tejpolicetimes.com/?p=104384#respond Thu, 05 Sep 2024 00:45:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104384 Vidhan sabha : राज्यात मोदींचा तिसरा दौरा, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सभा; भाजपकडून तयारी सुरु

PM Modi will Visit vidarbha : पीएम मोदी राज्यात तिसऱ्यांदा दौऱ्यावर येत आहेत. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉमपंतप्रधान मोदी विदर्भ दौऱ्यावर म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आणि विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १९ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या […]

The post Vidhan sabha : राज्यात मोदींचा तिसरा दौरा, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सभा; भाजपकडून तयारी सुरु first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Vidhan sabha : राज्यात मोदींचा तिसरा दौरा, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सभा; भाजपकडून तयारी सुरु

PM Modi will Visit vidarbha : पीएम मोदी राज्यात तिसऱ्यांदा दौऱ्यावर येत आहेत. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पंतप्रधान मोदी विदर्भ दौऱ्यावर
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आणि विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १९ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. नागपूरमार्गे ते वर्धेला जातील. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किट आणि धनादेशाचे वितरण केले जाणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे भाजप नेते सक्रिय झाले असून त्यांचे नागपूर मार्गे आवागमन होणार असल्याने जिल्हा प्रशासन व सुरक्षा यंत्रणाही सज्ज होत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी केंद्राने वर्धा जिल्ह्याची निवड केली आहे. स्वावलंबी शाळेच्या मैदानावर कार्यक्रम होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट व पक्षाचे नेते सुमित वानखेडेदेखील उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येत्या सोमवारी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

पालघर वाढवण बंदर भूमिपूजन

मागील वीस दिवसात दोन पीएम मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. ३० ऑगस्ट शुक्रवारी रोजी मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर मोदी आले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला मोदींनी भेट दिली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते पालघरला रवाना झाले, पालघर येथील सिडको ग्राऊंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय मोदी यांच्या हस्ते मत्स्यव्यवसायासंबंधी २१८ प्रकल्पांचे भूमिपूजनही पार पडले. सुमारे १५६० कोटी रुपयांचे हे प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले आहे.

लखपती दीदी योजना

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव येथे विमानतळ परिसरात रविवारी २५ ऑगस्ट रोजी ‘लखपती दीदी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदींनी आधीच्या सरकारची ७० वर्षांतील कामांचा पाढा वाचून दाखवला. काय म्हणाले मोदी, माझ्या सरकारच्या काळातील कामे पाहा, आमच्याइतकी महिला सक्षमीकरणाची कामे कुणी केली नाहीत,’ असा दावाही मोदी यांनी केला. एक कोटी महिला लखपती ‘तीन कोटी महिलांना लखपती करण्याचे आश्वासन लोकसभेत दिले होते. त्यानुसार एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत. मागील दोन महिन्यांत ११ लाख लखपती दीदी झाल्या आहेत,’ असे सांगून मोदी यांनी आम्ही २० लाखांपर्यंत मुद्रा कर्ज देणार आहोत, असेही जाहीर केले.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post Vidhan sabha : राज्यात मोदींचा तिसरा दौरा, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सभा; भाजपकडून तयारी सुरु first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104384 0
Maharashtra Vidhan Sabha: राज्याच्या ७ हायप्रोफाईल मतदारसंघात अटीतटीची लढत, मंत्र्यांचीच निवडणुकीत होणार दमछाक https://tejpolicetimes.com/?p=103393 https://tejpolicetimes.com/?p=103393#respond Sun, 25 Aug 2024 09:28:03 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103393 Maharashtra Vidhan Sabha: राज्याच्या ७ हायप्रोफाईल मतदारसंघात अटीतटीची लढत, मंत्र्यांचीच निवडणुकीत होणार दमछाक

सुरज सकुंडे, मुंबई : गेल्या ५ वर्षांत राज्याच्या राजकारणातील अनेक ट्विस्ट आपण पाहिले आहेत. राजकीय तज्ज्ञ तसेच कायदेपंडितांचंही डोकं लॉक होईल अशा घडामोडी या पाच वर्षांत घडल्या आहेत. युती आणि आघाड्यांतील उलटफेर, आमदारांची पळवापळवी, फोडाफोडीचं राजकारण या गोष्टींमुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली . २०१९च्या निवडणुकीनंतर अजित दादांना सोबत घेऊन फडणवीसांचं सरकार ८० तासांसाठी सत्तेत […]

The post Maharashtra Vidhan Sabha: राज्याच्या ७ हायप्रोफाईल मतदारसंघात अटीतटीची लढत, मंत्र्यांचीच निवडणुकीत होणार दमछाक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Maharashtra Vidhan Sabha: राज्याच्या ७ हायप्रोफाईल मतदारसंघात अटीतटीची लढत, मंत्र्यांचीच निवडणुकीत होणार दमछाक

सुरज सकुंडे, मुंबई : गेल्या ५ वर्षांत राज्याच्या राजकारणातील अनेक ट्विस्ट आपण पाहिले आहेत. राजकीय तज्ज्ञ तसेच कायदेपंडितांचंही डोकं लॉक होईल अशा घडामोडी या पाच वर्षांत घडल्या आहेत. युती आणि आघाड्यांतील उलटफेर, आमदारांची पळवापळवी, फोडाफोडीचं राजकारण या गोष्टींमुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली . २०१९च्या निवडणुकीनंतर अजित दादांना सोबत घेऊन फडणवीसांचं सरकार ८० तासांसाठी सत्तेत आले, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणले. पुढे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गट फुटून भाजपसोबत गेला आणि महायुती सरकार सत्तेत आले. त्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्री करून फडणवीसांसह सर्वांनाच धक्का दिला. पुढे राष्ट्रवादीही फुटली आणि अजित पवारही महायुतीत सामील झाले. आता गेल्या अडीच वर्षांपासून शिंदे-फडणवीस-अजितदादांचे महायुती सरकार सत्तेत आहे. सारं काही आलबेल आहे असं वाटत असताना २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात आणखी एका ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत भाजप तसेच महायुतीतील अनेक दिग्गजांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पराभूत केले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि सध्याच्या राजकारणाची बदलती दिशा पाहता आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुती सरकारमधील काही मंत्री डेंजर झोनमध्ये आहेत. कोण आहेत ते ७ मंत्री हेच आज आपण आज पाहणार आहोत.

डेंजर झोनमधील पहिले नाव आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार

वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शरद पवारांपासून फारकत घेऊन अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह महायुती सरकारमध्ये सामील झाले. एवढंच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरदेखील त्यांनी दावा केला. पुढं निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजितदादांना देऊ केले. अजितदादा एवढ्यावरच थांबलेत नाहीत, तर अजितदादांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सुप्रिया सुळेंनी १ लाख ५८ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला. विशेष म्हणजे अजित पवार आमदार असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना तब्बल ४७ हजार ३८१ मताधिक्य मिळाले. अजितदादांसाठी हा मोठा धक्का होता. आगामी विधानसभेच्या दृष्टीनं अजितदादांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. आता लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीतही अजितदादांना घेरण्यासाठी पावलं उचलताना दिसत आहेत. शरद पवार बारामती मतदारसंघात अजितदादांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली तर शरद पवार लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणूक हाती घेऊन अजित पवार यांची विधानसभेत जायची वाट बिकट होणार, यात शंका नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आपला गड राखणे कठीण

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात सपाटून मार खावा लागल्याने भाजपने आता सावध पवित्रा घेतला आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघातून गडकरींना सर्वाधिक मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना ३३ हजार ५३५ इतकेच मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. २०१४च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडघे यांचा ५८९४५ मतांनी तर २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्याच आशिष देशमुख यांचा ४९,३४४ मतांनी पराभव केला होता. परंतु यंदा मात्र राजकीय समीकरणं बदलली आहेत. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीमध्ये देशात मोदी लाट होती. या लाटेत काँग्रेस पक्षाची धुळधाण उडाली होती. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला आहे. नागपूर मतदारसंघातही काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी गडकरी तसेच फडणवीसांची चांगलीच दमछाक केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस फडणवीसांना घेरण्याची पूर्ण तयारी करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार तसेच विकास ठाकरे इत्यादी नेते देवेंद्र फडणवीसांना घेरण्याचा पूर्ण ताकद लावणार यात शंका नाही. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांचा यंदाच्या निवडणुकीत निश्चितच कस लागणार आहे.
शिंदे गटाच्या मंत्र्याचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीसाठी, विधानसभेसाठी तुतारीकडे ओढा, शिंदेंना धक्का बसणार

मंत्री शंभुराज देसाईंसाठीही मोठी आव्हानं

मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. साताऱ्यातील पाटण मतदासंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघात देसाई गट विरूद्ध पाटणकर गट हे पारंपारिक प्रतिस्पर्धी मानले जातात. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी १९५१ ते १९८३ अशी सलग ३३ वर्ष मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या निधनानंतर देसाई गट कमकुवत झाला होता. १९८३ ते २००४ अशी सुमारे २० वर्ष पाटणकर गटाची सत्ता होती. दरम्यान १९९७ नंतरच्या काळात आधी बाळासाहेब ठाकरेंनी आणि नंतर उद्धव ठाकरेंनी शंभुराज देसाईंना ताकद दिली. २००४ मध्ये मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा ५८५१ मतांनी पराभव करत शंभुराज देसाई आमदार झाले. पण २००९ मध्ये विक्रमसिंह पाटणकरांनी पुन्हा बाजी मारत शंभुराज देसाईंचा ५८० मतांनी पराभव केला. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजीत पाटणकर यांचा पराभव करत शंभुराज देसाई पुन्हा आमदार झाले. सध्या शंभुराज देसाईंचं राज्यातील वजन चांगलंच वाढलं आहे. सध्या ते महायुती सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठा निधी आणला आहे. परंतु त्याचवेळी पाटणकर यांनी नगरपालिका जिंकत शंभुराज देसाईंना धक्का दिला आहे. तसेच जिल्हा बँकेतही शंभुराज देसाईंचा पराभव केला आहे. महाविद्यालय तसेच येऊ घातलेल्या शुगरकेन प्रकल्पातून त्यांनी अर्थकारणावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे यंदा शंभुराज देसाईंपुढे पाटणकरांचे तगडे आव्हान असणार आहे. यातच पक्षफुटीनंतर शंभुराज देसाईंनी शिंदे गटाची साथ दिल्याने ते उद्धव ठाकरेंच्या ते रडारवर आहेत. तसेच आपल्या विश्वासू उमेदवाराला ताकद देण्यासाठी शरद पवारही मैदानात उतरणार हे निश्चित आहे. परिणामी शंभुराज देसाईंची यंदाची विधानसभेपर्यंतची वाट आव्हानात्मक असणार आहे.

मंत्री चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात भाजपातच नाराजीनाट्य

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे. कोथरूडमधून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची यांनी बालवडकरांनी तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. स्वपक्षातून विरोध होऊ लागल्याने चंद्रकांत पाटील यांची विधानसभेपर्यंतची वाट बिकट बनली आहे. भाजपने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना दिल्लीत संधी दिल्याने यावेळी देखील कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु अमोल बालवडकर यांनी या मतदारसंघावर दावा केल्याने चंद्रकांत पाटलांची डोकेदुखी वाढली आहे. बालवडकर यांनी कोथरूड भागात जनसंपर्क कार्यालय थाटले असून शहरात होम मिनिस्टर, लाडकी बहीण योजनेची माहिती सांगणारे रथ फिरवत मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघावरून भाजपकत बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीत फायदा घेत अचूक रणनिती आखल्यास महाविकास आघाडी चंद्रकांत पाटलांसमोर चांगले आव्हान निर्माण करू शकते.

नाराज नेत्यांमुळे विजयकुमार गावितविरोधी वातावरण

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासाठीही यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यावर अनेक वर्षांपासून गावित परिवाराचं वर्चस्व आहे. परंतु वर्चस्वाला लोकसभा निवडणुकीपासून हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. माजी खासदार हिना गावित लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची दुसरी मुलगी सुप्रिया गावित यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपद देखील धो क्यात आले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण सत्ताकेंद्रे गावित परिवाराकडे एकवटल्याने त्यांच्याविरोधात स्वपक्षातील अनेकजण नाराज आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत या नाराज मंडळींनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराची साथ दिली होती. हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास विजयकुमार गावित यांची विधानसभा निवडणुकीत दमछाक होणार हे नक्की.

मंत्री दादा भुसेंची निवडणूक आव्हानात्मक

सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांना आगामी विधानसभा निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित हिरे घराण्याच्या साम्राज्याला सुरुंग लावून भुसे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतर त्यांनी या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम राखले होते. परंतु यंदा मात्र त्यांच्यासमोर त्यांचेच एकेकाळचे खंदे समर्थक बंडू बच्छाव यांचे त्यांच्यासमोर तगडे आव्हान असू शकते. बंडू बच्छाव यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीवर दावा केल्याने दादा भुसेंसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात काँग्रेसचे तुषार शेवाळे रिंगणात होते. शेवाळे यांचा ४८ हजार मतांनी पराभव केला. परंतु यंदा मात्र शिवसेनेत फूट पडल्याने त्यांची शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. याशिवाय त्यांचेच सहकारी त्यांच्याविरोधात उभे राहिल्यास त्यांना आणखी फटका बसू शकतो. इतकी वर्ष आमदार असल्यामुळे दादा भुसेंना अँटीइन्कबन्सीचा देखील सामना करावा लागू शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

मंत्री छगन भुजबळांसाठी मराठा आरक्षणविरोध ठरु शकते डोकेदुखी

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांना यंदाची निवडणुक खूप कठीण असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर छगन भुजबळ अजित पवारांसोबत गेले. एवढंच नाहीतर अनेक सभांमध्ये त्यांनी शरद पवारांविरोधात आक्रमक भाषणं देखील केली आहेत. त्यामुळे छगन भुजबळ आता शरद पवारांच्याही रडारवर असणार आहेत. येवला मतदारसंघाचा इतिहास पाहता तो कायमच शरद पवारांसोबत राहिला आहे. त्यामुळे यंदा छगन भुजबळांचा कस लागणार हे नक्की. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेणेही भुजबळांना महागात पडू शकते. मराठा आरक्षणविरोधी भुमिकेमुळे भुजबळांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. मनोज जरांगे पाटील यांनी तर छगन भुजबळांना येवला मतदारसंघात पाडणारंच, असा निर्धार केला आहे. याशिवाय त्यांच्याविरोधात मतदासंघात अँटीइन्कम्बन्सीही दिसून येत आहे. त्याचाही फटका त्यांना बसू शकतो. त्यामुळे भुजबळांची यंदाची विधानसभेची वाट सुलभ नाही असेच दिसत आहे.

Source link

The post Maharashtra Vidhan Sabha: राज्याच्या ७ हायप्रोफाईल मतदारसंघात अटीतटीची लढत, मंत्र्यांचीच निवडणुकीत होणार दमछाक first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103393 0
काँग्रेसचे २ आमदार CM शिंदेंच्या भेटीला; पक्षांतराच्या चर्चेला उधाण, दोन्ही आमदार म्हणतात… https://tejpolicetimes.com/?p=102166 https://tejpolicetimes.com/?p=102166#respond Wed, 14 Aug 2024 08:11:16 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102166 काँग्रेसचे २ आमदार CM शिंदेंच्या भेटीला; पक्षांतराच्या चर्चेला उधाण, दोन्ही आमदार म्हणतात…

मुंबई: लोकसभेला राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीआधी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर मंगळवारी रात्री शिंदेंचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. दोघांनी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही आमदार शिंदेसेनेत […]

The post काँग्रेसचे २ आमदार CM शिंदेंच्या भेटीला; पक्षांतराच्या चर्चेला उधाण, दोन्ही आमदार म्हणतात… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
काँग्रेसचे २ आमदार CM शिंदेंच्या भेटीला; पक्षांतराच्या चर्चेला उधाण, दोन्ही आमदार म्हणतात…

मुंबई: लोकसभेला राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीआधी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर मंगळवारी रात्री शिंदेंचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. दोघांनी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही आमदार शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

महिन्याभरापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यात आल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे त्या आमदारांना पुढील निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याचे संकेत पक्षानं दिले. त्यामुळे कारवाई होण्याआधी आणि विधानसभेला तिकीट नाकारलं जाण्यापूर्वी दोन्ही आमदार पक्षांतर करतील या चर्चेनं जोर धरला आहे.
Congress MLA to join Shiv Sena : काँग्रेसला धक्का, आमदार खोसकर-अंतापूरकर ‘वर्षा’वर, शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चांना उधाण
जितेश अंतापूरकर नांदेडच्या देगलूर मतदारसंघाचे आमदार आहेत. तर हिरामण खोसकर नाशिकच्या इगतपुरीतून निवडून आले आहेत. अंतापूरकर भाजपचे खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा अंतापूरकर यांचं नाव चर्चेत होतं. अंतापूरकरही पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती.

काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. ई पीक पाहणी अहवालासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याचं अंतापूरकरांनी सांगितलं. ‘२०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत देगलूर, बिलोरीतील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पण त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कापूस, सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार मदत मिळते. ही मदत तुटपुंजी आहे आणि अद्याप तीदेखील मिळालेली आहे. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांना भेटलो,’ असं अंतापूरकर म्हणाले.
Sindhudurg Vidhan Sabha: सिंधुदुर्गच्या राजकारणात आमदार वर्चस्व राखणार की वारं फिरणार? मविआ विरुद्ध महायुती चुरस
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनीही शिंदेंच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं. ‘दोन, तीन विद्यार्थ्यांची कामं होती. समाज कल्याण खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे त्यांना भेटायला गेलो’, असं खोसकरांनी सांगितलं. शिंदेसेनेत जाण्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं. मी आहे तिथेच राहणार आणि मला १०० टक्के तिकिट मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तुम्ही शिंदेंकडे जाणार याची तुमच्या पक्षश्रेष्ठींना कल्पना होती का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर निधीसाठी मी प्रत्येक मंत्र्यांकडे जातो. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेही गेलो होते. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासाठी २०० कोटींचा निधी हवा असल्यानं अजित पवारांची भेट घेतली. प्रत्येकवेळी मुख्यमंत्री, मंत्र्यांना भेटताना पक्षश्रेष्ठींकडे विचारता येत नाही. आमच्या भेटी टीव्ही चॅनलवर दाखवल्यानं घरात बसलो, लोकांची कामं झाली नाहीत, तर लोक आम्हाला मतं देतील, असा सवाल त्यांनी विचारला.

Source link

The post काँग्रेसचे २ आमदार CM शिंदेंच्या भेटीला; पक्षांतराच्या चर्चेला उधाण, दोन्ही आमदार म्हणतात… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102166 0
Mahayuti in Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून हार, आता विधानसभेसाठी ‘अब की बार, २०० पार’, महायुतीचा काय आहे प्लॅन? https://tejpolicetimes.com/?p=102033 https://tejpolicetimes.com/?p=102033#respond Tue, 13 Aug 2024 03:57:05 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102033 Mahayuti in Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून हार, आता विधानसभेसाठी ‘अब की बार, २०० पार’, महायुतीचा काय आहे प्लॅन?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : लोकसभेला झाले गेले ते आता विसरून जा. आता आपला पक्ष महायुती असून, पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार समजून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांप्रमाणेच कार्यकर्तेही आपापसातील मतभेद, मनभेद विसरून एकत्र आल्यास विधानसभा निवडणुकीत महायुतीला २०० जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत […]

The post Mahayuti in Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून हार, आता विधानसभेसाठी ‘अब की बार, २०० पार’, महायुतीचा काय आहे प्लॅन? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Mahayuti in Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून हार, आता विधानसभेसाठी ‘अब की बार, २०० पार’, महायुतीचा काय आहे प्लॅन?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : लोकसभेला झाले गेले ते आता विसरून जा. आता आपला पक्ष महायुती असून, पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार समजून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांप्रमाणेच कार्यकर्तेही आपापसातील मतभेद, मनभेद विसरून एकत्र आल्यास विधानसभा निवडणुकीत महायुतीला २०० जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे राज्यात ‘एकजूट महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत असून, याअंतर्गत येत्या ३० ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर महायुतीने आता आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्रीतरीत्या समन्वय साधून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची समन्वय समितीची बैठक नाशिकमध्ये सोमवारी (दि. १२) बोलविण्यात आली होती. या बैठकीला मंत्री उदय सामंत यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, खासदार स्मिता वाघ, शिवसेना नेते सचिन जोशी, नरहरी झिरवाळ, योगेश टिळेकर, अनिकेत तटकरे, देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले, सरोज अहिरे, मंजुळा गावित या आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी संघटित होऊन विरोधकांकडून सोशल मीडियाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांना सडेतोड उत्तर द्यावे. राज्यात एका पक्षाच्या नेत्यावर टीका झाली, तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर रान पेटवले. त्या पक्षापेक्षा आपली ताकद अधिक आहे. आपणही आपल्या नेत्यावर टीका केली तर महाराष्ट्र कसा पेटवू शकतो हे दाखवून देण्याची गरज आहे, असे आवाहन सामंत यांनी मनसेचे नाव न घेता केले. महायुतीने दिलेला उमेदवार मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला निवडून आणण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने करावा. यासाठी एकजूट महाराष्ट्र अभियान आयोजित करण्यात आले असून, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून राज्यभर दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत येत्या ३० ऑगस्टला नाशिकमध्ये होणारा महामेळावा ऐतिहासिक ठरावा, यासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सामंत यांनी सांगितले.
अजित पवार यांचे गुलाबी जॅकेट, शरद पवार यांचे मिश्किल उत्तर, पत्रकाराच्या प्रश्नावर शाळा घेतली

समन्वय बैठकीतच असमन्वय

या बैठकीत आरपीआयचे नेते व मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेण्यात आले नाही. यामुळे प्रकाश लोंढे यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीच्या बैठकीत मित्रपक्ष रिपाइंचे नाव घेण्यास लाज कसली, अशा शब्दात कानटोचणी करताना रिपाइंला सन्मानाची वागणूक दिल्यासच महायुतीत समन्वय राहील, असा इशारा लोंढे यांनी दिला. तसेच लाडकी बहीणच्या विभागवार समित्यात आम्हाला का डावलले असा जाबही त्यांनी नेत्यांना विचारला. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर उदय सामंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
Mumbai Vidhan Sabha : लोकसभेत पक्षाची दमदार कामगिरी, विधानसभेसाठीही कंबर कसली, काँग्रेसमधून लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली

निर्णयांची पुस्तिका छापणार : भुसे

गेल्या दोन वर्षांत जेवढे लोकांसाठी चांगले निर्णय झाले, तेवढे गेल्या २० वर्षांत झाले नाहीत असा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी केला. त्यामुळे महायुती सरकारच्या काळात घेतलेल्या चांगल्या निर्णयाची पुस्तिका तयार करून ती घरोघरी पोहचविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Source link

The post Mahayuti in Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून हार, आता विधानसभेसाठी ‘अब की बार, २०० पार’, महायुतीचा काय आहे प्लॅन? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102033 0
विलासरावांनी तुम्हाला CM पदाची संधी दिली, तुम्ही साथ का सोडली? नांदेडमध्ये जाऊन विचारणा https://tejpolicetimes.com/?p=101869 https://tejpolicetimes.com/?p=101869#respond Sun, 11 Aug 2024 14:04:23 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101869 विलासरावांनी तुम्हाला CM पदाची संधी दिली, तुम्ही साथ का सोडली? नांदेडमध्ये जाऊन विचारणा

अर्जुन राठोड, नांदेड : महाराष्ट्रात जेव्हा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालीला वेग आला होता तेव्हा स्व. नेते विलासराव देशमुख यांनी त्यांचे वजन मराठवाड्याचे सुपुत्र म्हणून तुमच्या पारड्यात टाकले. जनतेचीही तुम्हाला साथ होती. असे असताना तुम्ही काँग्रेसची साथ का सोडली? असा प्रश्न माजी मंत्री, काँग्रेस नेते अमित चव्हाण यांनी भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांना विचारला. रविवारी नांदेडमध्ये काँग्रेसची […]

The post विलासरावांनी तुम्हाला CM पदाची संधी दिली, तुम्ही साथ का सोडली? नांदेडमध्ये जाऊन विचारणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विलासरावांनी तुम्हाला CM पदाची संधी दिली, तुम्ही साथ का सोडली? नांदेडमध्ये जाऊन विचारणा

अर्जुन राठोड, नांदेड : महाराष्ट्रात जेव्हा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालीला वेग आला होता तेव्हा स्व. नेते विलासराव देशमुख यांनी त्यांचे वजन मराठवाड्याचे सुपुत्र म्हणून तुमच्या पारड्यात टाकले. जनतेचीही तुम्हाला साथ होती. असे असताना तुम्ही काँग्रेसची साथ का सोडली? असा प्रश्न माजी मंत्री, काँग्रेस नेते अमित चव्हाण यांनी भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांना विचारला.

रविवारी नांदेडमध्ये काँग्रेसची विभागीय बैठक पार पडली. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले. आमदार अमित देशमुख यांच्या टीकेचा रोख मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर होता. कधी काव्यात्मक फटकेबाजी करत तर कधी गतकाळातील प्रसंगाची आठवण करून देत अमित देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.
‘अशोका’ची पतझड पण ‘वसंत’ फुलला, विलासराव स्टाईलने फटकेबाजी, अमित देशमुखांचं भाषण चर्चेत

विलासरावांनी अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली

तुम्ही दोन वेळेस मुख्यमंत्री पदावर होतात. जनतेने तुमची साथ सोडली नव्हती. मग तुम्ही काँग्रेस पक्षाची साथ का सोडली? असे आक्रमकपणे अमित देशमुख यांनी विचारले. स्व. शंकरराव चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांना ताकद दिली होती. हे विलासराव देशमुख विसरले नव्हते. महाराष्ट्रात जेव्हा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला होता, तेव्हा स्व. विलासराव देशमुख यांनी स्वतः मोठं मन करत अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. एवढचं नाही तर नांदेडला दोन वेळेस मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. जनतेने तुमची साथ सोडली नाही, तुम्ही का साथ सोडली? असे अमित देशमुख यांनी विचारले.

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर प्रहार

भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर आमदार अमित देशमुख यांनी भाजपावर सडकून टीका केली. सत्ताधिकाऱ्यांनी मराठवाड्यात घर फोडले, लातुरमध्ये तर चक्क देवघर फोडले, पण देव्हाऱ्यातील देव आमच्या सोबत असल्याचे देशमुख म्हणाले. विलासराव देशमुख यांना राजकारणात आणण्याचे काम शिवराज पाटील यांनी केले आणि त्यांना मोठे करण्याचे काम स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी केलं. हे आम्ही आजही विसरलो नाहीत. महाराष्ट्रात परिवर्तन आणण्याचे काम आता आम्ही करत आहोत, असे देशमुख म्हणाले.

Source link

The post विलासरावांनी तुम्हाला CM पदाची संधी दिली, तुम्ही साथ का सोडली? नांदेडमध्ये जाऊन विचारणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101869 0