Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महिन्याभरापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यात आल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे त्या आमदारांना पुढील निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याचे संकेत पक्षानं दिले. त्यामुळे कारवाई होण्याआधी आणि विधानसभेला तिकीट नाकारलं जाण्यापूर्वी दोन्ही आमदार पक्षांतर करतील या चर्चेनं जोर धरला आहे.
जितेश अंतापूरकर नांदेडच्या देगलूर मतदारसंघाचे आमदार आहेत. तर हिरामण खोसकर नाशिकच्या इगतपुरीतून निवडून आले आहेत. अंतापूरकर भाजपचे खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा अंतापूरकर यांचं नाव चर्चेत होतं. अंतापूरकरही पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती.
काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. ई पीक पाहणी अहवालासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याचं अंतापूरकरांनी सांगितलं. ‘२०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत देगलूर, बिलोरीतील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पण त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कापूस, सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार मदत मिळते. ही मदत तुटपुंजी आहे आणि अद्याप तीदेखील मिळालेली आहे. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांना भेटलो,’ असं अंतापूरकर म्हणाले.
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनीही शिंदेंच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं. ‘दोन, तीन विद्यार्थ्यांची कामं होती. समाज कल्याण खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे त्यांना भेटायला गेलो’, असं खोसकरांनी सांगितलं. शिंदेसेनेत जाण्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं. मी आहे तिथेच राहणार आणि मला १०० टक्के तिकिट मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुम्ही शिंदेंकडे जाणार याची तुमच्या पक्षश्रेष्ठींना कल्पना होती का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर निधीसाठी मी प्रत्येक मंत्र्यांकडे जातो. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेही गेलो होते. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासाठी २०० कोटींचा निधी हवा असल्यानं अजित पवारांची भेट घेतली. प्रत्येकवेळी मुख्यमंत्री, मंत्र्यांना भेटताना पक्षश्रेष्ठींकडे विचारता येत नाही. आमच्या भेटी टीव्ही चॅनलवर दाखवल्यानं घरात बसलो, लोकांची कामं झाली नाहीत, तर लोक आम्हाला मतं देतील, असा सवाल त्यांनी विचारला.