Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा फुरसुंगी परिसरात दूध टाकायचे काम करीत होता. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ‘भोसले व्हिलेज’ येथून तो दुचाकीवरून हडपसरच्या दिशेने जात होता. भेकराईनगर येथील बस डेपोसमोर आला असता, समोरून सासवडच्या दिशेने जात असलेल्या ट्रकने समोरील ट्रकला ओव्हरटेक करताना दुसऱ्या दिशेला जाऊन गणेशच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये तो उडून रस्त्यावर आपटल्याने गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच गणेशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकचालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
घरची परिस्थिती बिकट
घोडके कुटुंबीय मूळचे सोलापूर येथे राहणारे असून, कामाच्या शोधात ते पुण्यात गंगानगर येथे स्थायिक झाले होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गणेश सकाळी दूध टाकायचे काम करीत असत.
पुरानंतर आरोपांची ‘चिखलफेक’
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यावरून पुण्यात गुरुवारी उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात आरोपांची ‘चिखलफेक’ झाली. या पुराची पूर्वकल्पना महापालिकेला दिल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला, तर सांगितल्यापेक्षा अधिक विसर्ग केल्यामुळे पूर आल्याचा पवित्रा महापालिका प्रशासनाने घेतला. दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत जलंसपदा विभागाला धारेवर धरले.