Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घरगुती कामगारांसाठी कल्याणकारी योजना; कोणती मदत मिळते? पात्रता काय? जाणून घ्या अटी व शर्ती

15

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : घरगुती काम करणाऱ्या महिला, पुरुषांना तुटपुंजा पगारात स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना सुरू केली आहे. कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना हे लाभ दिले जातात.

कोणती मदत मिळते?

– नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास ३० हजार रुपये
– अपघाती मृत्यू ओढवल्यास ७५ हजार रुपये
– कायमस्वरूपी अपंगत्व ओढवल्यास ७५ हजार रुपये
– अंशत: अपंगत्व आल्यास सभासदास ३७ हजार ५०० रुपये
– पाल्यास इयत्ता ९ वी ते १२ वी करिता, तसेच आयटीआयचा कोर्स करीत असल्यास, दरवर्षी उर्त्तीण होत असल्यास, दर तिमाहीकरिता ३०० रुपये, जास्तीत जास्त दोन मुलांकरिता
– मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसास अंत्यविधी सहाय्य दोन हजार रुपये
– घरेलू कामगारास दोन अपत्यांपर्यंत प्रत्येक प्रसूतीकरिता पाच हजार रुपये मदत
– पाल्यांना विदेशी भाषा शिकता यावी, यासाठी होणारा खर्च घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात येतो
– पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे ९०० रुपये व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी ६५० रुपये देण्यात येतात

आवश्यक पात्रता काय आहे?
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यांमध्ये त्रुटी; १५ लाख लाभार्थ्यांची बॅंक खाती चुकीची किंवा बंद
अटी व शर्तीनुसार लाभ

– महाराष्ट्रातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल
– अर्जदार घरगुती कामगार असणे आवश्यक
– घरकाम करणारा व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेंतर्गत घरकाम कामगार योजनेंतर्गत लाभ घेत असता कामा नये
– अर्जदार व्यक्तीची घरकाम कामगार संघटनेमध्ये नोंदणी असणे आवश्यक

ही आहेत आवश्यक कागदपत्रे
– आधारकार्ड
– रहिवाशी दाखला
– पासपोर्ट आकाराचे फोटो
– नोंदणी प्रमाणपत्र
– रेशनकार्ड
– बँक खात्याचा तपशील
– जेथे काम करत आहे, तेथील मालकाचे संपूर्ण नाव व पत्ता

अर्ज कोठे करावा?
जिल्हा सहाय्यक कामगार अधिकारी, उद्योग भवन, आयटीआय सिग्नल, त्र्यंबकरोड, नाशिक

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.