Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune Bus Fire: पुण्यात खासगी बसला भीषण आग, २० मिनिटे पाण्याचा मारा, आग नियंत्रणात; Video

15

पुणे : पुण्यातील हडपसर येथे एका खासगी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. तब्बल २० मिनिटे पाण्याचा फवारा करून अग्निशमन दलाच्या जवानांनी खासगी बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. हडपसर येथे कदम बाग वस्तीलगत (सोलापूर महामार्ग) येथे एका बसला आग लागल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून हडपसर आणि पीएमआरडीए येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एका खासगी बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आहे. त्याचवेळी जवानांनी प्रथम बसमध्ये कोणी आहे का? याची खात्री करून घेतली. पाण्याचा मारा करत सुमारे २० मिनिटांत आग पूर्ण विझवत धोका दूर केला. या घटनेत जखमी कोणी नसून या बसमधील १४ प्रवासी आणि वाहनचालक सुरक्षित आहेत. बस पूर्ण जळाल्याने प्रवाशांचे सामान आणि डिक्कीमधील एक दुचाकी देखील जळाली आहे.
Pune Hit And Run: पुण्यात पुन्हा हिट अँड रन; चारचाकीने दुचाकीस्वाराला नेलं फरफटत, अंगावर काटा आणणारा VIDEO

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे तसेच वाहनचालक नारायण जगताप, जवान बाबा चव्हाण, अनिकेत तारु, अविनाश ढाकणे, रामदास लाड व पीएमआरडीएचे वाहनचालक संदिप शेळके, जवान लक्ष्मण मिसाळ, आकाश राठोड, सुरज इंगवले, संकेत कुंभार यांनी सहभाग घेतला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.