Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sindhudurg Vidhan Sabha: सिंधुदुर्गच्या राजकारणात आमदार वर्चस्व राखणार की वारं फिरणार? मविआ विरुद्ध महायुती चुरस

8

सिंधुदुर्ग : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत तळकोकणातील राजकारण वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. तळकोकणात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या तीन मतदारसंघांत वेगवेगळ्या पक्षाचे आमदार नेतृत्व करतात. कणकवली विधानसभा मतदारसंघाचं भाजपचे नितेश राणे नेतृत्व करतात आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच प्राबल्य आहे. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे नेतृत्व आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांचं सत्र सुरु आहे. विधानसभेची मोर्चेबांधणी करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या बैठकांचा धडाका लागला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात आपली पकड भक्कम केली आहे.त्यामुळे या मतदारसंघात भाजप सोडून अजून कोणत्याही राजकीय पक्षाने दावा केलेला नाही. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हा प्रश्नचिन्हा आहे. २०१९ मध्ये नारायण राणे यांना सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटामध्ये गेलेले सतीश सावंत यांनी नितेश राणेंविरोधात लढत दिली. त्यांचा राणेंनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. यातच कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंनी लोकसभेच्या निवडणुकीत नारायण राणे यांना ४२ हजाराचं मताधिक्य मिळवून दिलं. ही लीड पाहता कोणताही प्रतिस्पर्धी उमेदवार अद्याप समोर आलेला नाही. नितेश राणेंनी दोन टर्म आमदार म्हणून या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. यंदाच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे.
Nitesh Rane warns Police : पोलिसांनो, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पोस्टिंग करुन, बायकोला फोनही लागणार नाही, नितेश राणेंचा दम
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं प्राबल्य आहे. २०१९ मध्ये नारायण राणे यांचे शिलेदार रणजीत देसाई या मतदारसंघातून उभे होते. त्यांचा पराभव करत वैभव नाईक विधानसभेत निवडून गेले. तर नाईकांनी सलग दोन वेळा या मतदारसंघांचं नेतृत्व केले. मात्र २०२४मध्ये वैभव नाईक यांच्यासमोर नवी आव्हानं उभी राहिली आहेत. या मतदारसंघांमध्ये भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक वर्षापासून या मतदारसंघांमध्ये कामांचा जोरदार धडका लावला आहे. एवढंच नाही तर या मतदारसंघातून नाईकांना जोरदार धक्का देत नारायण राणे यांनी २६ हजार २३६ इतके मताधिक्य मिळवले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक हे १४ हजार ३४९ हजारांचं मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. परंतु यंदा आव्हानं उभी ठाकल्याने वैभव नाईक यांच्यावर पराभवाची टांगती तलवार आहे. त्याचप्रमाणे मात्र माजी खासदार निलेश राणे यांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातुन विजयाची खात्री असली तर भाजपकडून निलेश राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Sangli Politics: सांगली मविआसाठी चांगली? जागावाटप जवळपास फिक्स, ठाकरेंकडून पैलवानासह सिद्धार्थ जाधव रिंगणात?
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मंत्री दीपक केसरकर यांची वर्चस्व आहे. दीपक केसरकर यांनी सलग तीन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व केले. शिवसेनेत फूट पडण्याआधी ते निवडून आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत शिंदे गटामध्ये सामील झाले. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुक लागली आणि लोकसभेचे उमेदवार असलेले आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून ३७ हजाराचं मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे विधानसभेत हा आकडा कायम ठेवल्यास आमदारकी दीपक केसरकर यांच्या पदरात पडू शकते. या मतदारसंघात महायुतीचे मित्रपक्ष असलेले भाजपचे नेते माजी आमदार राजन तेली यांचा देखील दावा केला आहे. भाजपकडूनच निवडणूक लढवणार असा दावा राजन तेली यांनी केला आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांची यंदा डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे देखील गेल्या एक वर्षापासून या मतदारसंघांमध्ये तयारी करत आहेत. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये अर्चना घारे यांनी आपलं प्राबल्य वाढवलं आहे.त्यामुळे शरद पवार गटाकडून अर्चना घारे यांना उमेदवारी फायनल असल्याचे म्हटले जात आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर कोकणात विधानसभेचा राजकीय शिमगा पाहायला मिळणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.