Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दादांच्या जनसन्मान यात्रेआधीच महायुतीत पडला मोठा बॉम्ब; जागा आमच्यासाठी सोडा…RPIची मागणी

10

पिंपरी : अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच त्यांना मोठा धक्का बसण्याचा शक्यता आहे. आज अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पिंपरी विधानसभा मतदारसंघात येणार आहे. त्याआधीच अजित पवार यांचे विश्वासू आणि पिंपरी विधासभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात महायुतीतच रान पेटलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांची ओळखच विकासाचा दादा अशी आहे. परंतु त्यांच्या पक्षातील विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात मागील पाच वर्षात कोणतंही काम केले नाही. एका बाजूला अजितदादांचं काम तर दुसऱ्या बाजूला या आमदाराचं काम आहे. अजितदादांना तसेच त्यांच्या पक्षाला सुध्दा हे शोभत नाहीत. त्यामुळे पिंपरीची जागा महायुतीत आरपीआयला ( आठवले गट ) सोडावी अशी मागणी आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांनी महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनशी बोलताना केली आहे. तसेच वेळ पडल्यास मी घड्याळाच्या चिन्हावर देखील लढायला तयार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या…

पिंपरी मतदारसंघात एकूण ३५ ते ४० झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांत विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, समाज मंदिर, एखादा रूग्णालय, खेळाचे मैदान असणं महत्वाचं आहे. परंतु अण्णा बनसोडे यांनी यापैकी कोणतेही काम केले नाही. मागील पाच वर्षात त्यांनी कोणतं काम केलं आहे. त्याची कुणालाच कल्पना नाही, त्यांचं मतदारसंघात कुठेही काम दिसत नाही. फक्त मंडळांना वर्गणी देणे हे एकच काम त्यांनी आतापर्यंत केले असून त्यावरच ते आमदार होऊ शकतात. असा आत्मविश्वास त्यांना आहे. परंतु हे लोकांना आता कळून चुकलं आहे. त्यांच्यात कुठलंही काम करण्याची धमक नाही. येणाऱ्या निवडणुकीत लोकांची मते घ्यायची असतील तर अजितदादांसारखा माणूस हवा आहे. तिथे अण्णा बनसोडे सारखा माणूस देऊन चालणार नाही. त्यांना निवडणुकीत उतरवलं तर महायुतीचा पराभव निश्चित आहे, असं चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या.

उद्धव ठाकरे आमदार नसताना CM, पृथ्वीराजबाबा केंद्रातून राज्यात आले, मुख्यमंत्रिपदाला नशीब लागते : अजित पवार
अजितदादांसोबत आम्ही जवळपास सात ते आठ वर्षे काम केलं आहे. स्वत: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करत असतांना अजितदादा पालकमंत्री होते. यातच २००२ ला राष्ट्रवादीसोबत रिपब्लिकन पक्षाची युतीही होती. अजितदादांसोबत माझी चांगली ओळख असून त्यांनी जर मला उमेदवारी दिली तर मी तयारच आहे. असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपसह रिपब्लिकन पार्टीने चांगलं काम केलं आहे. लोकांचा देखील विश्वास आता आमच्यावर बसला आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.