Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ambernath Hit And Run Case: मुलानेच केला वडिलांच्या खुनाचा प्रयत्न; अंबरनाथ हिट अँड रन प्रकरणावर आली मोठी अपडेट
घरगुती वादातून ३८ वर्षीय मुलाने फिल्मी स्टाईलने कार चालवत वडिलांच्या कारचा पाठलाग करत जोरदार धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना बदलापूर – अंबरनाथ मार्गावरील चिखलोली गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल एस ३ पार्कच्या समोर घडली होती. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात वडील बिंदेश्वर शर्मा (वय ६२, रा. कुलाबा मुंबई ) यांच्या तक्रारीवरून मुलगा सतीश शर्मा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता बिंदेश्वर शर्मा आणि त्यांचा मुलगा सतीश हे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरून वेगवेगळ्या कारने जात होते. बिंदेश्वर आणि कुटूंब एका पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये होता तर ; काळ्या टाटा सफारीत आरोपी मुलगा सतीश त्याच्या मागे जात होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, अंबरनाथच्या दिशेनं टाटा सफारी कार चालली होती, त्यावेळी घटनास्थळी काही करणावरून वाद होऊन दोन्ही कार थांबल्या असता, त्या ठिकाणी थांबलेल्या लोकांनी धाव घेतली. मात्र आरोपी सतीशने आधी त्याच्या वडिलांच्या कारला मागून धडक दिली.
त्यानंतर पुढे वळवला आणि हॉटेल S3 पार्कच्या समोर थांबलेल्या कार पुढे येण्याआधी तो परत आला. वडिलांच्या कारला जोरदार धडक दिल्यानंतर, जेव्हा कार चालकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दार उघडले, तेव्हा त्याने त्याला आणि त्याच्याजवळ बसलेल्या एका अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत केली. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या लोकलवर त्यांची धडक झाली. यूटन मारताना एक व्यक्ती आरोपीच्या कारच्या बोनेटवर खाली पडून रस्त्यावर कोसळला/ एवढा वर आरोपी सतीश थांबला नाही तर त्याने त्याच्या वडिलांच्या कारला धडक देण्यासाठी यू-टर्न घेतला तेव्हा त्याला ५० फूट ढकलत गेले. या अपघातात दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले .
दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा सफारी चालवणारा चालक हा फिर्यादी याचा मुलगा असून त्याची पत्नी यांच्यात वैवाहिक कलह असल्याचा संशय आहे. फिर्यादी यांना दोन मुलं असून ते संरक्षण खात्यातून निवृत्त झाले आहेत. घटनेच्या दिवशी ते पत्नी आणि दुसऱ्या मुलासोबत मुंबईत राहत होते. दुसरा मुलगा आणि त्याची पत्नी यांच्यातील वाद मिटवण्यासाठी वडील, आई आणि त्यांचा दुसरा मुलगा मुंबईहून बदलापूरला आले होते. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेची नोंद अंबरनाथ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा करून जखमींना उपचारसाठी खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र घटनेच्या काही मिनिटातच या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा व्हायरल झाला.