Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Bhiwandi Kasheli Ghat Suitcase Dead Body: दुसरीकडे मृतक पती हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने आरोपी अनुभवने मृतकची पत्नीशी संगनमत करून पती बलराम उर्फ शेखरच्या हत्येचा कट रचला होता.
हायलाइट्स:
- अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराकडून पतीच्या हत्येचा कट
- पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह सुटकेसमध्ये खाडीत फेकला
- ठाण्यातील भिवंडी येथील धक्कादायक घटना
Badlapur Case: गुन्हे दोन, FIR एक, स्वतःच्या सोयीनुसार शब्दरचना, बदलापूर प्रकरणात पोलिसांची हलगर्जी समोर
दुसरीकडे मृतक पती हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने आरोपी अनुभवने मृतकची पत्नीशी संगनमत करून पती बलराम उर्फ शेखरच्या हत्येचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे ७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पती बलरामची त्याच्या राहत्या घरातच धारदार शस्त्राने हत्या करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून कशेळी भागात असलेल्या खाडी पात्रात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी मृतक बलराम दिसत नसल्याचे पाहून त्याच्या एका नातेवाईकाने नारपोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे आणि नातेवाईकाने दिलेल्या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने तपास सुरू केला.
पोलीस तपासात कशेळी भागातील घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच आरोपी अनुभव आणि मृतकची पत्नी दिसून येत नसल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. त्यादरम्यान, एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अनुभव आणि मृतकची पत्नी दोघेच जाताना दिसत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या मोबाईलचे लोकेशन उत्तरप्रदेश मधील लखनऊमध्ये दिसून येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे हे पोलीस पथकासह स्थानिक पोलिसांच्या मदतीने लखनऊमध्ये जाऊन सापळा रचत आरोपी आणि मृतकच्या पत्नीला ताब्यात घेऊन त्यांना भिवंडीत आणले.
Today Top 10 Headlines in Marathi: नेपाळ अपघातात जळगावच्या २७ जणांचा अंत, शिखरचा रामराम चाहत्यांना खंत, सकाळच्या दहा हेडलाईन्स
आरोपी अनुभव आणि मृतकच्या पत्नीकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. बलरामची राहत्या घरात हत्या करून त्याचा मृतदेह एका बॅगमध्ये कशेळी खाडीत फेकून दिल्याचे सांगितले. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी या प्रकरणी स.पो.नि. रंगनाथराव वडणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रियकरासह पत्नीवर १०३(१) सह २३८,३ (५) अन्वये नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रियकर अनुभव यास अटक केली आहे. तर मृतकची पत्नी पोलिसांच्या ताब्यात आहे.
अटक आरोपी अनुभवला न्यायालयात हजर केले असता २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृतक बलरामचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी कशेळी खाडी भागात शोध मोहीम राबवली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पो.नि.ज्ञानेश्वर कदम करीत आहेत.