Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

…तर यांची पळताभुई थोडी होईल, अशा कोल्हे-कुईला मी घाबरत नाही; उदय सामंत यांचा टोला

8

प्रसाद रानडे, रत्नागिरी : मिऱ्या येथे अद्याप कोणतीही एमआयडीसी झालेली नाही, पण या विषयाचं काही लोक राजकारण करत आहेत. आमच्या जमिनी घ्या असे सांगायला आलेले लोक कोण आहेत त्यांची नावे जर का मी जाहीर केली तर याना पळताभुई थोडी होईल, पण असं राजकारण मी करत नाही आणि अशा कोल्हे-कुईला मी घाबरत नाही, अशा शब्दात रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. टाटा उद्योग समूह आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल सेंटरच्या १९१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी रत्नागिरी शिरगाव येथे करण्यात आलं. यावेळी उदय सामंत यांनी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचं नाव न घेता टीका केली आहे.

आमदार बाळ माने यांना सामंतांचा टोला

मिऱ्या येथील प्रस्तावित एमआयडीसीवरुन भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे, याच विषयावरून उद्योग मंत्र्यांनी टोला लगावला आहे.

उदय सामंत पुढे म्हणाले की, मिऱ्या नावाच्या गावामध्ये अजून एमआयडीसी झालेली नाही. फक्त एमआयडीसीचे नोटिफिकेशन काढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पण काही लोकांचा एवढा गैरसमज झाला की मिऱ्यावर जाऊन उदय सामंतच शंभर एकर जागा घेत आहेत आणि जागा एमआयडीसीला विकायची आहे अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनावलं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तसंच रिफायनरी बाबतीतही दबावतंत्र वापरून कोणतीही एमआयडीसी होणार नाही, आमचे अधिकारी दबावतंत्र वापरणार नाहीत, हे मला मिऱ्या एमआयडीसी विषयावरून माझी नाहक बदनामी करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे, असं म्हणत उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Nanded News : मृत्यू आधी चिठ्ठी लिहिली, सावकाराच्या सततच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाने आयुष्य संपवलं; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘एमआयडीसी कोणाला नको असेल, तर मला कोणतीही जबरदस्ती करायची नाही’

मिऱ्या येथे जाऊन केवळ आमच्या अधिकाऱ्यांनी सर्वे केला आहे. हे करत असताना तेथील ग्रामस्थ आमच्या अधिकाऱ्यांसह बसले होते. आमचं घरी घेऊ नका, मंदिर घेऊ नका, देवाच्या जागा घेऊ नका असा प्रस्ताव त्यांनी आमच्या समोर ठेवला आणि ते मान्य केल्यानंतर आम्ही नोटिफिकेशन काढलं याचा अर्थ तिथे कारखाने आले असं अजिबात नाही. या जिल्ह्याचा विकास हा पर्यटन उद्योगातून झाला पाहिजे, या माध्यमातून ते उचललेलं पाऊल होतं. पण त्या ठिकाणी एमआयडीसी कोणाला नको असेल तर मला कोणतीही जबरदस्ती करायची नाही असंही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘उदय सामंत असं करतो, उदय सामंत तसं करतो उदय सामंत याने जबरदस्ती केली आहे, अशा प्रकारच्या ब्रेकिंग येत होत्या. मी गेल्या वीस वर्षांमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं राजकारण केलं आहे आणि त्याच्यामुळे आज रतन टाटा यांचा १९० कोटी रुपयांचा प्रकल्प रत्नागिरी येथील चंपक मैदानावर होत आहे. जी जागा आजपर्यंत कोणाच्या ललाटीत नव्हती ती जागा एमआयडीसीने काढल्यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या दोनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आपण केलं, अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
Vidhan Sabha Election : राज्यात शिंदे-फडणवीस-अजितदादांचं सरकार, पण महायुतीसाठी निवडणूक सोपी नसणार; ही आहेत ६ कारणं

… तर पळताभुई थोडी होईल

काही लोकांना केवळ विरोधाचं राजकारण करण्याचं जमतं, अशी टोलेबाजी करत कोणतीही जोरजबरदस्ती करून एमआयडीसी होणार नाही असंही उद्योगमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

काही लोक राजकारण करत आहेत आणि राजकारण एवढं करत आहेत की तिथे जाऊन काही मला जणू ताजमहाल बांधायचा आहे आणि मला तिथे काहीतरी माझी जमीन विकायची आहे अशा प्रकारचे राजकारण सुरू आहे. जे काही लोक माझ्याकडे जमीन घ्या म्हणून सांगायला आले, त्यांची जर मी नावं जाहीर केली तर यांची पळताभुई थोडी होईल, पण मी राजकारणामध्ये काही राजकीय नियम पाळतो आणि म्हणून एक महिन्यापूर्वी माझ्याकडे तिथले कोण आले होते त्यांची नावं उघड करायला मला लावू नका, असाही सूचक इशारा सामंत यांनी दिला आहे.

१४ वर्षे बंद पडलेल्या भारतीय शिपाईड प्रकल्प आम्ही सुरू केला. त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळतो आहे. पण किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण काही लोक करत आहेत. पण माझ्या नंतर लक्षात आलं, की आता निवडणुका जवळ आल्या आहेत आणि विधानसभेची निवडणूक आल्यामुळे आपण काहीतरी चांगले करतोय असं सांगण्याचा काही प्रयत्न करत आहेत अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनावलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.