Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कृत्रिम तलावांतील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच? ‘या’ महापालिकेच्या कबुलीनंतर मुंबईसंदर्भातही प्रश्नचिन्ह

8

Mumbai News: माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला, कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत करण्यात येते, असे उत्तर मिरा-भाईंदर महापालिकेने दिले आहे.

हायलाइट्स:

  • मुंबई महापालिकेकडून सुस्पष्ट माहिती मिळणे आवश्यक
  • आधीच पीओपीच्या मूर्तींबाबत निर्देशांनंतरही अंमलबजावणी नाही
  • त्यात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित मूर्तींबाबत संभ्रम
महाराष्ट्र टाइम्स
ganesh visarjan
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने यंदा सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचा वापर करता येणार नाही हे स्पष्ट केलेले असले, तरी मुंबईतील अनेक मंडळांमध्ये पीओपीच्या मोठ्या मूर्ती विराजमान झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, विराजमान झालेल्या मूर्तींचे किमान नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला, कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत करण्यात येते, असे उत्तर मिरा-भाईंदर महापालिकेने दिले आहे. त्यामुळे मुंबईमधील कृत्रिम तलावांमधील विसर्जनाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केले तर प्रदूषण होणार नाही, असा गणेशभक्तांचा समज असतो. मात्र, मे महिन्यामध्ये मिरा-भाईंदर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरातून वेगळीच माहिती समोर आली आहे. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केलेल्या मूर्तींचे दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत विसर्जन करण्यात येते, असे मिरा-भाईंदर महापालिकेने सांगितले. ठाणे महापालिकेतर्फेही कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी खाडीत किंवा समुद्रात करण्यात येते, असे माहिती अधिकारात समजल्याचे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींसंदर्भातील याचिकादार रोहित जोशी यांनी स्पष्ट केले. सन २०२३मध्ये यासंदर्भात माहिती मिळाली होती. यामध्ये, मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया करून मग ते पाणी नाल्यांमध्ये सोडले जाते; तसेच उर्वरित डेब्रीज ठाणे खाडीमध्ये टाकले जाते, असे सांगण्यात आले होते.

महामुंबई परिसरातील दोन महापालिकांकडून माहिती अधिकारात मिळालेल्या या उत्तरानंतर, मुंबईतील कृत्रिम तलावांसंदर्भातील प्रश्नाचे उत्तर मिळणेही आवश्यक असल्याचे जोशी म्हणाले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसंदर्भात निर्देश मिळूनही याची अंमलबजावणी होत नसेल, तर समुद्रामध्ये या काळात होणारे प्रदूषण, त्याचा सागरी जैवविविधतेवर होणारा परिणाम हा प्रश्न मोठा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Ganesh Chaturthi 2024: ‘गणेश चतुर्थी’वर निबंध लिहताय? मुद्देसूद आणि वाचनीय लिखाणासाठी आवश्यक माहिती, वाचा सविस्तर
कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित होणाऱ्या शाडूच्या मातीच्या मूर्तींची विल्हेवाट लावण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे गणेशोत्सव समन्वयक उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली. मात्र, या संस्थांनाही केवळ शाडूची माती हवी असते. त्यामध्ये इतर घटक मिसळलेले चालत नाही. गणेशभक्तांनी शाडूच्या मूर्तींचा वापर वाढवावा, यासाठी मुंबई महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई महापालिकेकडून स्पष्ट उत्तर नाही

मुंबईत कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होणाऱ्या मूर्तींची संख्या दरवर्षी वाढत असताना, या मूर्तींचे पुढे काय होते या प्रश्नाचे सुस्पष्ट उत्तर मिळू शकलेले नाही. महामुंबई परिसरातील इतर दोन महापालिकांप्रमाणेच मुंबई महानगरपालिकाही कृत्रिम तलावांमधील मूर्ती नंतर समुद्रात विसर्जित करते का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेकडून यासंदर्भात माहिती दिली जात नसल्याने या शंकेला बळकटी मिळत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.