Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune Mahayuti NCP Vs BJP: हडपसर येथील उड्डाण पुलाच्या बांधकामात हस्तक्षेप केल्याने पुलाची उंची आणि रुंदी कमी झाली आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आमदाराविरोधात आंदोलन केलं तसेच, त्यांच्या नामफलकावर काळंही फासलं.
महाराष्ट्रत सत्तेत असलेल्या सरकारमध्ये कुठे ना कुठे संघर्ष पाहायला मिळत आहे. पक्षाच्या जबाबदार नेत्यांकडून करण्यात येणारी वक्तव्य आणि आरोपांमुळे महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता अधिक बळावली गेली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्या येवढं नालायक खात कोणतं नाही, असं विधान केले होते. तर मला राष्ट्रवादीसोबत बैठकीला बसल्यानंतर उलट्या येतात असंही विधान शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी केलं होतं. शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते अशा प्रकारचे विधान करत असताना पुण्यात आज राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये श्रेय वाद पेटलेला पाहायला मिळाला.
भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न करणाऱ्या हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकाला काळे फासून आंदोलन केले. महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला, राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. आंदोलकांनी पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे सांगितले.
हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला असताना विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले यांना यावेळी केला. मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे २३ कोटी रुपये मंजूर असताना केवळ १४ कोटी ६० लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठविला. विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाची रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हडपसरमध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही महायुती धर्मास तिलांजली देणार असा इशारा आंदोलकांनी दिला. भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्याने महायुतीत मिठाचा खडा पाडलाय.