Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Worli Vidhan Sabha : ठाकरे गटाने प्रचंड ताकदीने शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. त्यांनी मालमत्ता जाहीर केली आहे
हायलाइट्स:
- आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
- गुरुपुष्यामृत योग साधत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केले.
- आदित्य ठाकरे यांच्याकडे १५.४३ कोटी रुपयांची जंगम संपत्ती आणि ६.०४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीत पक्षाचे नेते सुभाष देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील गटनेते अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, विभाग संघटक सुधीर साळवी आदी सहभागी झाले होते. प्रत्यक्ष अर्ज भरताना उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे उपस्थित होते.
Amit Thackeray : कर्करोगाच्या चर्चा, राखेतून भरारी; अमित राज ठाकरे मनसेसाठी कसे ठरणार तारणहार?
आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती?
आदित्य ठाकरे यांनी यावेळी १५.४३ कोटी रुपयांची जंगम संपत्ती असल्याचे जाहीर केली आहे. ६.०४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहेत. प्रतिज्ञापत्रातील तपशीलानुसार त्यांच्याकडे १.९ कोटी रुपये किमतीचे दागिने आहेत.
भेट म्हणून मिळालेल्या मालमत्तेचे मूल्य २.७७ कोटी रुपये असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. भेट म्हणून देण्यात आलेल्या मालमत्तेत वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून २०१३ साली खालापूर येथील जमिनीचे पाच भूखंड आणि आई रश्मी ठाकरे यांच्याकडून २०१९ साली ठाणे, घोडबंदर रोड आणि कल्याण येथील प्रत्येकी एक गाळा आहे.
Aaditya Thackeray Net Worth : 4.2 लाखांची BMW कार, 1.9 कोटींचे दागिने, खालापूरची जमीन; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
आदित्य यांच्यावर ४३.७६ लाख रुपयांचे कर्ज आहे. तसेच त्यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू गाडी असून २०१९ मध्ये खरेदी केलेल्या या गाडीची किंमत ४.२१ लाख रुपये इतकी आहे. आदित्य यांच्याकडे रोख ३७,३४४ रुपये आहेत. सुमारे २.८ कोटी रुपये बँकांमध्ये जमा आहेत. म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये त्यांची १० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
Pratap Patil Chikhalikar : माजी मुख्यमंत्र्यांना पाडणाऱ्या जाएंट किलरचा भाजपला रामराम, दादा गटाला सीट सुटल्याने मोठा निर्णय
याशिवाय अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये जयंत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, गुलाबराव पाटील, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, यशोमती ठाकूर आदींचा समावेश आहे.