Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Flower Market: परतीच्या पावसानं झेंडूचे ७५ टक्के नुकसान; लक्ष्मीपूजनाला फुलं महागण्याची शक्यता

9

Flower Market: पावसामुळे जिल्ह्यातील झेंडू पिकाचे सुमारे ७० ते ७५ टक्के नुकसान झाले. त्यामुळे यंदा लक्ष्मीपूजनासाठी झेंडू महागण्याची शक्यता उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स
marigold1

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : परतीचा म्हणता म्हणता अवकाळीत रूपांतरीत झालेल्या पावसाचा फटका इतर पिकांसह झेंडूलाही बसला. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील झेंडू पिकाचे सुमारे ७० ते ७५ टक्के नुकसान झाले. त्यामुळे यंदा लक्ष्मीपूजनासाठी झेंडू महागण्याची शक्यता उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रकाशपर्वाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये नाशिककरांची रेलचेल वाढली आहे. नवीन कपडे, वाहने, इलेक्ट्रीक वस्तूंसह गृहसजावटीच्या वस्तू आणि दिवाळीच्या फराळालाही मोठी मागणी आहे. ग्राहकांमुळे बाजारपेठांत पाय ठेवायला जागा नाही, तर दुसरीकडे अवकाळीमुळे झेंडू पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. बाजारपेठेत सद्यस्थितीला इतर फुलांसह झेंडूचीही आवक घटली आहे. त्यामुळे झेंडूला प्रतिक्रेट अडीचशे ते तीनशे रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, लक्ष्मीपूजनला झेंडूंची मागणी दुपटीहूनही अधिक वाढणार आहे. त्यामुळे दरांतही वाढ होण्याची शक्यता आहे. दसऱ्याला झेंडूसाठी तीनशे ते चारशे रुपये क्रेटचा दर मिळाला होता. लक्ष्मीपूजनला यात वाढ होऊन दर पाचशे रुपये क्रेटपर्यंत जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरात सद्यस्थितीला मखमलाबाद, मातोरी, मुंगसरेसह इतर भागांतूनही झेंडूंची आवक होत आहे.
मविआचा तिढा सुटेना; जागावाटपाबाबत नाना पटोलेंच्या पत्रामुळे वादाची नवी ठिणगी, पत्रात नेमकं काय?
अपेक्षांवर पाणी
पावसाने होणाऱ्या नुकसानीमुळे यंदा झेंडूची लागवडही कमी झाली होती. त्यामुळे दसऱ्याला झेंडूला ३०० ते ४०० रुपये क्रेटचा दर मिळाला. दिवाळीतही उत्तम दर मिळण्याची अपेक्षा असताना गेल्या अवकाळीमुळे अपेक्षांवर पाणी फेरल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

उत्पन्नाची हमी नसल्यामुळे यंदा झेंडूची लागवड कमी झाली. यातच पावसाळ्यातही फूलशेतीचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे झेंडूचे सुमारे ७० ते ७५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनला झेंडूला अधिकचा दर मिळण्याची अपेक्षा आहे.- सदाशिव मेहंदळे, शेतकरी
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण, भाईसाठी केलं…
यंदा दसऱ्याला झेंडूचे दर वाढलेले होते. अवकाळीमुळे आता आवक कमी झाली आहे. त्यामुळे फूल बाजारात झेंडूही महाग झाला आहे. लक्ष्मीपूजनाला झेंडूच्या मागणीत मोठी वाढ होईल. दर पाचशे रुपये प्रतिक्रेटपर्यंत जाण्याची शक्यता आहे.- महेंद्र दिवे, व्यावसायिक

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.