Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जरांगेंकडे उमेदवारीची मागणी, महंत तुकोजी बुवा आता राजकीय आखाड्यात उतरणार! जाणून घ्या यांच्याविषयी

8

Mahant Tukoji Buva in Tuljapur Vidhan Sabha: राजकीय पक्षांच्या उमेदवारी टप्प्याटप्प्याने याद्या समोर येत असल्याने आता खऱ्या अर्थाने विधानसभेचा रणसंग्राम रंगणार आहे. यातच आता राजकीय पक्षाच्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारही रिंगणात उतरत आहेत. तुळजापूर मतदारसंघांतही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. आई तुळजाभवानी संस्थानातील मुख्य महंत तुकोजी बुवा यांनी आता राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.

Lipi

धाराशिव : राजकीय पक्षांच्या उमेदवारी टप्प्याटप्प्याने याद्या समोर येत असल्याने आता खऱ्या अर्थाने विधानसभेचा रणसंग्राम रंगणार आहे. यातच आता राजकीय पक्षाच्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारही रिंगणात उतरत आहेत. तुळजापूर मतदारसंघांतही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. आई तुळजाभवानी संस्थानातील मुख्य महंत तुकोजी बुवा यांनी आता राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. याबाबत विनोद पिंटू गंगणे मित्रमंडळ यांनी आज बैठक घेऊन एकमुखी निर्णय घेतला आहे. उमेदवारीसाठी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडेही उमेदवारीची मागणी केली आहे. महंत तुकोजी बुवा हे उमेदवार असतील. मनोज दादा जरांगे पाटील यांनी जर उमेदवारी मागे घेण्यास सांगितले तर उमेदवारी मागे सुद्धा घेऊ, अशीही भूमिका महंत तुकोजी बुवांनी घेतली आहे. परंतु मराठा आरक्षणासासाठी ते विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे.

माजी नगरसेवक सज्जन साळुंखे हे सुद्धा मराठा समाजाकडून इच्छुक असून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट सुद्धा घेतली आहे. तुळजापूरात विधानसबा मतदारसंघात यंदा भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट धीरज कदम पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर स्नेहा सोनकाटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपने सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदाराचं तिकीट कापलं, ढसाढसा रडले; मतदारसंघात नवा शिलेदार कोण?
उजनी धरणाचे पाणी, तुळजापूर शहराचा विकास तसेच मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण व इतर आरक्षणचे मुद्दे व विकासाचा दृष्टिकोन असणारा नेता तुळजापूर शहरातून उमेदवार असावा असा निश्चय तुळजापूर शहरातील विनोद पिटू गंगणे मित्र मंडळ यांनी केला आहे.

यापूर्वी दिवंगत आमदार साहेबराव हंगरगेकर हे काँग्रेसकडून दोन वेळा तुळजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर शेतकरी कामगार पक्षाकडून माजी आमदार कैलासवासी माणिक खपले हे तीन वेळा आमदार होते. तुळजापूर शहरातील हे स्वगृहातील दोनच व्यक्ती आमदार होऊ शकले आता तुळजापूरकरांना वाटतंय की, तुळजापूरातील उमेदवार असावा आणि हा उद्देश ठेवून महंत तुकोजी बुवा यांना पुढे करण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील हे काय निर्णय घेतात याकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे. त्यांनी जर उमेदवारी दिली तरच महंत तुकोजी बुवा हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे ठरवण्यात आले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.