Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Dry Fruits Prices Hike: दिवाळीच्या फराळासह थंडीचीही चाहूल लागल्याने पौष्टिक लाडूंसाठी सुकामेव्याची मागणी वाढली आहे. अशातच दिवाळीत भेट स्वरूपात देण्यासाठी आकर्षक स्वरूपात पॅकिंग केलेला सुकामेवाही बाजारपेठेत दाखल झाला आहे.
काजू, अंजीर आणि अक्रोडच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. दीपोत्सवास सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यानिमित्त बाजारपेठेतही चैतन्य अवतरले असून, कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तू, वाहने आदींच्या खरेदीची लगबग सुरू आहे. घरोघरी फराळाचाही सुगंध दरवळू लागला आहे. दिवाळीच्या फराळासह थंडीचीही चाहूल लागल्याने पौष्टिक लाडूंसाठी सुकामेव्याची मागणी वाढली आहे. अशातच दिवाळीत भेट स्वरूपात देण्यासाठी आकर्षक स्वरूपात पॅकिंग केलेला सुकामेवाही बाजारपेठेत दाखल झाला आहे. नातेवाइकांसह मित्र परिवारास देण्यासाठी नागरिकांकडून, तर कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यावसायिकांकडूनही मागणी वाढली आहे. बाजारात अडीचशे रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंतचा आकर्षक पॅकिंगमधील सुकामेवा उपलब्ध आहे.
दिवाळीच्या निमित्ताने सुकामेव्याला मागणी वाढली आहे. मुख्यतः आकर्षक पॅकिंगमधील सुकामेव्याला अधिक पसंती मिळत आहे. कर्मचाऱ्यांना भेट स्वरूपात देण्यासाठी कंपन्यांकडून सर्वाधिक मागणी केली जात आहे. – नीरज बोथरा, व्यावसायिक
कुरबुरी अन् कुरघोड्या! दोन्ही आघाड्यांतील खलबते संपेना, उमेदवारी अर्जासाठी आज शेवटचा दिवस, चित्र स्पष्ट होणार
… असे आहेत दर (प्रतिकिलो)
काजू १००० ते १६००
बदाम ७६० ते १०००
अंजीर १३०० ते २०००
अक्रोड १३०० पासून
पिस्ता ११०० पासून
मखाणा १२०० पासून
किसमिस २८०
पुण्यात ‘बंडोबां’नी वाढवली कॉंग्रेसची डोकेदुखी; कसबा पेठ, पर्वती, शिवाजीनगरमध्ये थोपटले दंड
मिठाईसह बासुंदी, रसमलाई, चॉकलेट, केकचीही चलती
मिठाईच्या दुकानांत सकाळपासूनच चकली, शेव-चिवडा, शंकरपाळे या खमंग पदार्थांबरोबरच लाडू, ड्रायफ्रूटस आणि मिक्स मिठाई आदी पदार्थांचाही दरवळ पसरत आहे. या पदार्थांसोबतच मिक्स मिठाईसह ड्रायफ्रूट मिठाईलादेखील मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पाव, अर्धा, एक किलोच्या पॅकिंगला वाढती मागणी दिसून येत आहे. मलई मिक्स मिठाईचा एका किलोचा दर ४०० रुपये, मलई बर्फी व मिल्क केक ४८० रुपये, रसमलाई ४८० रुपये, तर काजू-अंजीर मिक्स मिठाईचा एका किलोचा दर ८०० रुपयांपर्यंत आहे. महागाईमुळे मिठाईच्या दरात वाढ झालेली आहे. मात्र, दिवाळीतील मिठाई खरेदीचा उत्साह यामुळे कमी झालेला नाही.