Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Navi Mumbai News: नवी मुंबईतही खळबळजनक घटना घडली आहे. मित्राच्या स्कुटीला धडक दिल्याचा राग अनावर झाल्याने पाच सहा जणांच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवी मुंबईत सानपाडा येथे ही घटना घडली आहे.
ऐन दिवाळीत नवी सानपाडा येथील हिट अँड रनची ही घटना घडली आहे. या घटनेत एका मद्यपी कार चालकाने तीन जणांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा अपघात गुरूवारी मध्यरात्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिग्विजय शेळके असे आरोपीचे नाव असून तोच स्कार्पिओ चालवत होता. सानपाडा सेक्टर एक येथे अखिलेश कुंदर, आयुष पाटील, युगांत वास्कर, अमित पाटील, समर पाटील, निहाल इंदुलकर आणि सिद्धेश कांबळे हे मित्रांनी किचन डिलाइट हॉटेलजवळील रस्त्यावर जमले होते. यातील आयुष हे थोडे उशिरा स्वतःची कार घेऊन आले असता त्यांच्या गाडीला एका अनोळखी स्कुटी चालकाने धडक मारली, यावरुन वाद पेटला. यानंतर स्कुटी चालकाने याबद्दल त्याचा मित्र यातील आरोपी दिग्विजय शेळके याला कळवले. शेळके हा थेट स्कार्पिओ घेऊन आला आणि आपल्या मित्राशी वाद घालणाऱ्या त्या पाच जणांच्या अंगावरुन गाडी घातली.
दरम्यान गाडी वेगात येत असल्याचे लक्षात आल्यावर सर्व जणांनी जीव वाचवण्यासाठी आटापिटा केला. तरीही शेळके काही थांबला नाही पु्न्हा गाडी दामटवली आणि जाता जाता त्या पाच जणांना शिवीगाळ करून धमकी देखील दिली आणि निघाला. यामधील पीडितांचा जीव मात्र सुदैवाने बचावला आहे. पीडितांमधील एकाने शुक्रवारी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची दखल घेत कारचालक शेळकेविरोधात गु्न्हा नोंदवण्यात आला आहे.
याचप्रकरणी कारचालकाने देखील उलट पोलिसांत उलट तक्रार दाखल केली आहे. पाच जणांनी एकत्र मिळून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. स्कुटी चालक मित्राला दमदाटी करत असल्याचे कळल्यावर मी भांडण सोडवण्यास गेलो होते मात्र सर्व आरोपींनी मला मारण्याचा प्रयत्न केला. तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न केला, असा आरोप करीत दिग्विजय शेळकेने अखिलेश कुंदर आणि इतरांच्या विरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यामुळे पोलिसांनी कुंदर आणि इतराविरोधात गुन्हा नोंदवला आहे.