Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पाडवे वेगळे, आता सोबत भाऊबीजही नाही? अजित दादा अन् सुप्रिया ताईंचा ‘प्लान’ ठरला

13

Ajit Pawar Supriya Sule: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता पवार कुटुंबात बरीच मोठी फूट पडल्याचं दिसत आहे. यंदा प्रथमच कुटुंबात दोन पाडवे साजरे झालेले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता तशीच फूट पवार कुटुंबातही झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज बारामतीकरांना प्रथमच पवारांच्या कुटुंबातील दोन पाडवे पाहावे लागले. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पाडवे वेगळे साजरे झाले. पाडव्याला अजित पवारांची बाकीच्या कुटुंबियांसोबत भेट झालीच नाही. आता उद्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज होण्याची शक्यताही कमीच आहे. कारण उद्या पवारांनी बारामतीत भरगच्च कार्यक्रम आखलेला आहे. जवळपास १२ ते १३ तास अजित पवार दौऱ्यावर असणार आहेत.

राजकीय मतभेद असले तरीही पवार कुटुंब एक राहील, त्यांची दिवाळी सोबत जाहीर होईल, असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाही. आज वेगवेगळे पाडवे साजरे करणारे शरद पवार आणि अजित पवार उद्या भेटतील याची शक्यता जवळपास धूसर झाली आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज होण्याची शक्यता मावळली आहे. दोन्ही भावंडांचे दिवसभरातील कार्यक्रम पाहता भाऊबीज साजरी होणं अवघड आहे.
महायुतीकडून सरवणकरांना नवी ऑफर, विचार सुरु; उमेदवारी अर्ज माघारी घेणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा बारामतीमधून लढत आहेत. उद्या त्यांचा गावभेट दौरा आहे. सकाळी सातपासून गावभेट दौरा सुरु होईल. दौऱ्याची सांगता रात्री आठ-साडे आठच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. या कालावधीत अजित पवार २७ गावांना भेटी देतील. त्याची सुरुवात वंजारवाडीपासून सकाळी होईल. अजित पवारांचा भरगच्च दौरा पाहता ते भाऊबीजेसाठी वेळ काढण्याची शक्यता कठीण आहे. त्यामुळे पाडव्यापाठोपाठ भाऊबीज सोहळ्यालाही संपूर्ण पवार कुटुंब सोबत नसेल.
BJP-MNS: माहीमसह अनेक जागांवर भाजप-मनसेची छुपी युती? सेनेच्या उमेदवारांना भीती; शिंदेंचं नुकसान किती?
पवार कुटुंबाची एकत्र भाऊबीज काटेवाडीत व्हायची. त्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित असायचं. पण उद्याची भाऊबीज शरद पवारांच्या गोविंदबागेत होईल. हा कार्यक्रम झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळ पक्षाच्या कामासाठी कोल्हापूरला जाणार आहेत. संध्याकाळी ४ वाजता त्या बारामतीहून कोल्हापूरला रवाना होतील. तिथे त्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे संध्याकाळी त्या बारामतीत नसतील. तर अजित पवार दिवसभर गावभेट दौरा करतील.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.