Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वत्र प्रचारसभा सुरु आहेत. नांदेड उत्तरमध्ये महायुतीकडून एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
नांदेड लोकसभा आणि नांदेड उत्तर विधानसभेसाठी आज प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला उमेदवार संतुकराव हंबर्डे, बालाणी कल्याणकर हजर होते. दोघांना नामदार करा, असं आवाहन या सभेतून मतदारांना करण्यात आलं. या सभेसाठी वापरण्यात आलेली वीज चोरण्यात आलेली होती. महावितरणाच्या तारेवर आकडा टाकून वीज चोरी करण्यात आली. तीच वीज प्रचारसभेसाठी वापरण्यात आली. या वीज चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काँग्रेसच्या वॉर रुममधून फोनाफोनी; ८ बड्या नेत्यांकडून मोहीम फत्ते, मविआला सर्वात मोठा दिलासा
आमदारांच्या प्रचारसभेसाठी वीज चोरी करायची गरज काय? आमदारांच्या सभेलाच वीज चोरी केली जात असेल, तर सामान्यांनी कोणता आदर्श घ्यायचा?, असे प्रश्न आसपासचे लोक विचारत आहेत. बालाजी कल्याणकर नांदेड उत्तरचे आमदार आहेत. ते शिंदेसेनेत आहेत. पक्षानं त्यांना पुन्हा संधी दिली आहे. २०१९ मध्ये काँग्रेसच्या डी. पी. सावंत यांचा १२ हजार मतांनी पराभव केला होता. एमआयएमच्या उमेदवारानं घेतलेली जवळपास ४२ हजार कल्याणकर यांच्या विजयात महत्त्वाची ठरली होती.
नवाब मलिकांच्या जावयाचं निधन; मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
विधानसभा निवडणुकीसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला होता. २६ ऑगस्टला त्यांचं निधन झालं. आजारी असतानाही ते पक्षासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का बसला. या प्रतिकूल परिस्थितीत चव्हाण यांनी निवडणूक लढवत काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवला. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसनं त्यांच्या मुलाला तिकीट दिलं आहे.