Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुख्यमंत्री पदासाठी माझ्या नावाची चर्चा असेल तर…. विनोद तावडेंनी सांगितलं CM पदाचं गणित

5

Chhatrapati Sambhajinagar News : विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना मी मुख्यमंत्री होणार नसल्याचं सांगितलं. त्याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत भाजपने मराठा समाजला खूप काही दिलं असल्याचंही सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : भाजपमध्ये ज्याच्या नावाची चर्चा होते, ते कधीच होत नाही. मुख्यमंत्री पदासाठी माझ्या नावाची चर्चा असेल तर मी कधीच मुख्यमंत्री होणार नाही हे फक्त लक्षात ठेवा. इतर राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेतील नावांची यादी सांगत भाजप नेते विनोद तावडे यांनी मी मुख्यमंत्री होणार नाही असं सांगितलं. ते आज मंगळवार माध्यमांशी बोलत होते.

विनोद तावडे पुढे म्हणाले, विधानसभेचा प्रचार सुरू झाला आहे. महायुतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ करून दिला आहे. प्रत्यक्ष मेट्रो, समृद्धी महामार्ग तसंच पायाभूत विकास यापासून सामान्य नागरिकांना लाभ होत आहे. तर अप्रत्यक्ष लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत विज, विद्यार्थ्यांना १० हजार लाभ, उज्वला योजना इत्यादी लाभ दिला आहे.
मविआच्या अडचणी वाढणार! वंचितचा उमेदवार वाढवणार काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचं टेन्शन? संगमनेरात आंबेडकरी तोफ धडाडणार

उद्धव ठाकरेंवर निशाणा

मध्यप्रदेशमध्ये असताना माध्यमांमध्ये बघितलं महाविकास आघाडी नेत्यांनी गद्दारांचा पंचनामा म्हणून एक जाहीरनामा जाहीर केला. मात्र गद्दारी कुणी केली? २०१९ महायुती म्हणून मतं मागितली. निकालनंतर विरोधी लोकांसोबत आघाडी केली. यावरून जनातेसोबत मतांसोबत, गद्दारी कुणी केली? असा सवाल तावडे यांनी केला. ठाकरे यांच्या चुकीच्या पावलामुळे झालं, यामुळे गद्दारांचा पंचनामा करायचा असेल तर उद्धव ठाकरेंनी आरसा बघावा, असा टोला विनोद तावडे यांनी ठाकरेंना लगावला.

लाडकी बहीण योजनेबाबत तावडे म्हणाले…

शरद पवार म्हणाले, महायुती सरकारने इतर योजना बंद करून तो पैसा लाडकी बहीण योजनेत लावला. यातून त्यांनी लाडकी बहीण योजना बंद करायचं सांगितलं. हे वक्तव्य लक्षात ठेऊन राज्यातील भगिनींनी लक्षात ठेवून मतदान करावं असं आवाहनही तावडे यांनी केलं.
Raigad News : निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी कारवाई, बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; कारणही सांगितलं

भाजपने मराठा समाजाला खूप दिलं

निवडणुकीचा न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तो त्यांच्यासाठी योग्य आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कुणी प्रयत्न करत असेल, तर विरोध करण्याचं कारण नाही. भाजपने मराठा समाजाला खूप दिलं असल्याचंही तावडे म्हणाले.

Vinod Tawde : मुख्यमंत्री पदासाठी माझ्या नावाची चर्चा असेल तर…. विनोद तावडेंनी सांगितलं CM पदाचं गणित

परतूर, बदनापूर आणि संभाजीनगर निवडणूक प्रचाराचा दौरा आहे. मराठा आरक्षणावर आम्ही काय केलं ते मराठा समाजापर्यंत पोहचू. आम्ही १३ टक्के आरक्षण दिलं, कोर्टात टिकलं. मात्र सरकार बदललं आणि महाविकास आघाडी सरकार पूर्तता करू शकलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षण गेलं हे मराठा समाजापर्यंत पोहोचवणार आहे, असंही तावडे म्हणाले.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.