Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sanjay Varma IPS : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस दलात मोठा बदल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्या जागी संजय वर्मा यांची राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती. शेवटी त्यांची बदली करण्यात आलीये.
हायलाइट्स:
Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत, संजय राऊत असं का म्हणाले?
नेते आणि मंत्र्यांचे फोन टॅपिंगचे आरोपही रश्मी शुक्ला यांच्यावर झाली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली होती. हेच नाही तर जून 2024 लाच रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपलेला असताना जानेवारी 2026 पर्यंत सरकारकडून वाढून देण्यात आला. नाना पटोले यांनी थेट म्हटले होते की, रश्मी शुक्ला यांची बढती नियमबाह्य आहे. त्यामध्येच आता त्यांची बदली करण्यात आलीये.
Sanjay Varma : रश्मी शुक्ला यांच्या जागी नियुक्त झालेले आयपीएस संजय वर्मा आहेत तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती
नाना पटोले आणि संजय राऊत यांच्याकडून कायमच भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यामध्येच विधानसभा निवडणूकीच्या पार्श्मभूमीवर रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलीये. रश्मी शुक्ला असताना विधानसभेची निवडणूक ही निपक्षपणे होऊ शकणार नसल्याचे थेट काँग्रेसकडून म्हणण्यात आले होते. याचवर्षी जानेवारी महिन्यातच रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले होते.