Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रोजगारात नाशिक अव्वल! तिरुवनंतपुरम, कोइम्बतूरला मागे टाकल्याचे सर्वेक्षणात उघड, काय सांगते आकडेवारी?
Nashik News: सन २०२३ मध्ये नाशिकमधील रोजगारात तब्बल १८६ टक्क्यांनी वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, नाशिकने तिरुवअनंतपुरम, कोइम्बतूर या शहरांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.
रोजगारासंदर्भातील जागतिक स्तरावरील महत्त्वाची संस्था असलेल्या ‘फाउण्डइट’ने सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात देशातील द्वितीय श्रेणीतील (टिअर टू) शहरांतील रोजगारवाढीचा आढावा घेण्यात आला असून, काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यातून रोजगारवाढीत नाशिकची भरारी समोर आली आहे. या अहवालानुसार, नाशिक, नागपूर व कोइम्बतूर या शहरांत माहिती तंत्रज्ञान (आयटी), सॉफ्टवेअर सेवा, बँकिंग, आर्थिक सेवा, विमा या क्षेत्रांतील रोजगार झपाट्याने वाढत आहे. देशातील महानगरांप्रमाणे ‘टिअर टू’ शहरांचाही प्रचंड वेगाने विकास होत असून, विशेषत: नाशिक, तिरुवनंतपुरम, कोइम्बतूर, ठाणे, कोची व नागपूर या सहा शहरांनी रोजगारवाढीत मोठी झेप घेतली आहे. नाशिक शहरात २०२३ मध्ये रोजगारात तब्बल १८६ टक्के वाढ झाली असून, २०२४ मध्ये बारा टक्के वाढ अंदाजित आहे. नाशिकमध्ये रोजगारात सन २०२१ मध्ये ७६ टक्के, तर २०२२ मध्ये ९१ टक्के वाढ झाली होती. मात्र, २०२३ मध्ये हा आकडा थेट १८६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. नाशिक शहरात बांधकाम, अभियांत्रिकी, सीमेंट, धातू, सॉफ्टवेअर आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात रोजगार वाढत असल्याचे निरीक्षण ‘फाउण्डइट’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
शरद पवारांचं मिशन नाशिक; १२ नोव्हेंबरला जिल्ह्यात सहा जाहीर सभा, असा असेल दौरा…
रोजगारातील वाढ (टक्क्यांमध्ये)
शहर- २०२१-२०२२-२०२३-२०२४ (अंदाजित)
नाशिक- ७६-९१-१८६-१२
तिरुवनंतपुरम- ७७-११-४-२४
कोइम्बतूर- ५५-१९-८-२१
ठाणे-६७-३१-७-२५
कोची-६३-११-९-२१
नागपूर-२४-२७-७-१७
Pune Crime: २४ वर्षीय महिलेचा बेडमध्ये सापडला मृतदेह, पुण्यातील घटनेनं खळबळ
नाशिकमधील उद्योग क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. ‘फाउण्डइट’च्या अहवालातून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाशिकमधील रोजगारवाढीचा दर असाच कायम राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.- मनीष रावल, उद्योजक