Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पक्षाच्या कार्यकर्त्याची पार्टी जीवावर बेतली, माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू; रात्री काय घडलं?

10

Warora Constituency Deputy Sarpanch Died In Congress Worker Party : निवडणुकीआधी उमेदवाराकडून ठेवलेल्या पार्टीत एका माजी उपसरपंचाचा मृत्यू झाला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

निलेश झाडे, चंद्रपूर : राज्यात निवडणुका काही दिवसांवर आल्या असून अनेक उमेदवारांकडून प्रचार, सभा तसंच कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे. अशाच एका उमेदवाराच्या पार्टीत दुर्दैवी घटना घडली आहे. एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या एका पार्टीत माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विहिरीत पडून माजी उपसरपंचाचा मृत्यू

वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रात्रीच्या वेळी भोजन आयोजित केलं होतं. या भोजनाच्या कार्यक्रमात जवळच्या पांझुर्णी येथील माजी उपसरपंच गजानन काळे हे सहभागी झाले होते. पार्टी सुरू असतानाच गजानन काळे एका सहकाऱ्यासह जवळच्या मोकळ्या जागेत गेले आणि तेथील विहिरीत पडले. विहिरीत पडल्याचा आवाज येताच सगळे विहिरीकडे धावले. दोघांपैकी एकाला पोहता येत असल्याने तो वाचला. मात्र गजानन काळे विहिरीत बुडाले. यात त्यांचा मृत्यू झाला.
आजवर चुकीच्या माणसांना निवडून दिलं, तेच तुमच्या जमिनी हडपायला बसलेत; गुहागरमध्ये राज ठाकरेंचं टीकास्त्र

निवडणुकीच्या काळात दुर्दैवी घटनेने चर्चांना उधाण

घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सोमवारी सकाळी मृतदेह बाहेर काढला. दुसरा दिवस उजाडला तरीही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांवर दबाव असल्याचं बोललं जात आहे. विहिरीत पडलेला व्यक्ती नशेत होता का? की त्यांना कुणी धक्का दिला? हा अपघात आहे की घातपात? अशा शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. निवडणुकीचा माहोल असताना एका पक्षाच्या पार्टीत अशी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहेत.
​इलेक्ट्रिक दुकानापासून सुरुवात, ​आता गुजरातच्या कुटुंबाने मुंबईत घेतले १९८ कोटींचे आलिशान फ्लॅट; ‘कबीर सिंग’ शेजारी

वरोरा मतदारसंघात कोण बाजी मारणार?

दरम्यान, वरोरा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे आहेत. ते खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू आहेत. दुसरीकडे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू अनिल धानोरकर हे वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरले आहेत. माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचा मुलगा करण देवतळे हे भाजपच्या तिकिटावर उभे आहेत.

Chandrapur Warora News : पक्षाच्या कार्यकर्त्याची पार्टी जीवावर बेतली, माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू; रात्री काय घडलं?

शिवसैनिकांनी (ठाकरे) हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी आग्रह धरला होता. तिकीट मिळालं नसल्याने ठाकरे गटाचे मुकेश जिवतोडे यांनी बंडखोरी केली आहे, तर भाजपचे अहेतेश्याम अली यांनी बंडखोरी केलेली आहे. याचा फटका महायुती, महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.