Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Online Poll Results : महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने अबू आझमी पुन्हा मनाखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. मात्र त्यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे.
तिहेरी लढत
भाजपने केलेल्या आरोपांच्या दलदलीत अडकलेले माजी मंत्री नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळवले आहे. विशेष म्हणजे पारंपरिक अणुशक्तीनगर मतदारसंघातून लेक सना मलिक यांना उतरवत नवाब मलिक यांनी शेजारच्या मतदारक्षेत्रात उडी घेतली आहे. मात्र महायुतीचे नेतृत्व करणारा मित्रपक्ष भाजपचा मलिक यांच्या उमेदवारीला विरोध आहे. भाजपने शिवसेना उमेदवार सुरेश कृष्ण पाटील उर्फ ‘बुलेट पाटील’ यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
ऑनलाईन पोलची पसंती कुणाला?
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने यूट्यूब चॅनेलवर पोल घेत युजर्सचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. २४ तासांच्या कालावधीत ८० हजारांहून अधिक ऑनलाईन युजर्सनी पोलमध्ये आपला सहभाग नोंदवला. यातील आकडेवारीनुसार ५९ टक्के युजर्सनी आपली पसंती सुरेश पाटील यांना दिली आहेत.
Uddhav Thackeray : राणेंपासून गैरसमजामुळे दुरावलो, ठाकरेंची पाठ वळताच ‘जय महाराष्ट्र’, बड्या नेत्याचा भाजप प्रवेश
त्यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार अबू आझमी यांना २६ टक्के मतं मिळाली आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांमध्ये ३३ टक्के मतांचा फरक आहे. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर नवाब मलिक असून त्यांना १४ टक्के युजर्सनी पसंती दिली आहे.
कुणाला किती मतं?
आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं, तर प्रथम क्रमांकावरील सुरेश पाटील यांना ४७ हजारांच्या आसपास युजर्सनी (५९ टक्के) मतदान केले आहे. दुसऱ्या स्थानावरील तीन टर्म आमदार अबू आझमी यांच्या पाठीशी २१ हजारांच्या जवळपास (२६ टक्के) ऑनलाईन मतदार आहेत. तर तिसऱ्या नंबरवरील अबू आझमी यांना साधारण ११ हजारांच्या घरात (१४ टक्के) मतं पडली आहेत.
Mankhurd Online Poll : मलिकांनी मतदारसंघ बदलला, आझमींच्या मानखुर्दचा निकाल पालटणार? ऑनलाईन पोलचे धक्कादायक अंदाज
आता प्रत्यक्ष मतदानात जनता कोणाच्या पाठीशी असणार हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. कारण ऑनलाईन मतदान असल्यामुळे यात मतदारसंघाबाहेरील युजर्सनीही आपली मतं नोंदवली आहेत. त्यामुळे हे आकडे प्रत्यक्ष मतदानाचे निदर्शक ठरु शकत नाहीत. ही आकडेवारी फसवी असू शकते.
मतदारसंघाची रचना कशी?
मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास, बहुतांश भाग हा झोपडपट्टीने व्यापला असून बैंगनवाडी आणि परिसरात म्हाडा तसेच खासगी विकासकांच्या माध्यमातून पुनर्विकासालाही चालना मिळत आहे. परंतु, संपूर्ण मतदारसंघात असलेली अमली पदार्थांची समस्या आणि त्याला प्रशासनाच्या साथीने वेसण घालण्यात अबू आझमी अयशस्वी ठरत असल्याची भावना मतदारांमध्ये रुजू लागली आहे. अमली पदार्थांच्या व्यापारावरुन तरुणांचे एकमेकांवर होणारे हल्लेही मानखुर्द-शिवाजीनगर परिसरात रोजचेच झाले आहे. जवळपास ५५ टक्के मुस्लिम मतदार या मतदारसंघात असून जवळपास ४० टक्क्यांच्या आसपास मराठी मतेही येथे आहेत.
Amit Thackeray : माहीमची उमेदवारी मिळताच ‘मातोश्री’वरुन मोठ्ठ्या शुभेच्छा मिळाल्या, अमित ठाकरेंनी सगळं सांगितलं
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय दिना पाटील यांना या मतदारसंघातून एकूण ९० हजार मताधिक्य मिळाले. परंतु, ३.२५ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात इतके मताधिक्य कमीच असल्याचे जाणकारांचे मत आहे. निवडणूक काळात आझमी प्रचारात फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांना विधानसभेत मदत करू नये अशी स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले नवाब मलिक हे येथून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असले, तरी महायुतीची ताकद त्यांच्या पाठीशी नाही. त्यामुळे तिघांमध्ये चुरशीची लढत होऊ शकते.