Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चित्रपट हिट करायचा असेल तर… साऊथ इंडस्ट्रीच्या निर्मात्यांना सापडलाय भन्नाट फॉर्म्युला, मराठीत होणार का प्रयोग?
south indian dubbed movies in hindi :जगभरात हिंदी भाषेची लोकप्रियता सध्या वाढताना दिसतेय. यात बॉलिवूडचं मोठं योगदान आहे हे विसरून चालणार नाही. गेल्या काही वर्षात हिंदी डब झालेल्या दाक्षिणात्य सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. म्हणूनच दाक्षिणात्य चित्रपट निर्मातेसुद्धा कमाई वाढवण्यासाठी हिंदीत चित्रपट डब करण्याच्या मागे आहेत.
गेल्या वर्षात ‘स्त्री २’ या चित्रपटानं सगळ्यात जास्त, म्हणजे जवळपास ६२७ कोटींची कमाई केली. या चित्रपटाला ‘पुष्पा २’नं मागे टाकलंय. याआधी प्रभासच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटानंही हिंदीत ५११ कोटींची कमाई केली होती. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त ‘केजीएफ २’ या चित्रपटानंही हिंदीत ४३५ कोटींची कमाई केली. ‘कल्की’, ‘आरआरआर’ या चित्रपटांनाही हिंदीत उत्तम प्रतिसाद मिळाला. कमाईच्या या आकडेवारीवरून हिंदी भाषेची ताकद समजल्यानंतर दाक्षिणात्य सिनेनिर्मात्यांमध्ये हिंदीत चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
चित्रपट हिट करायचा असेल तर… साऊथ इंडस्ट्रीच्या निर्मात्यांना सापडलाय भन्नाट फॉर्म्युला, मराठीत होणार का प्रयोग?
परदेशात हिंदी चित्रपट लोकप्रिय
जगभरात हिंदी चित्रपटांची लोकप्रियता वाढतेय, हे कमाईचे आकडे बघून लक्षात येतं. परदेशात शाहरुखच्या चित्रपटांसाठी प्रेक्षक वेडे आहेत, केवळ हे चित्रपट बघता यावेत, यासाठी परदेशी लोक हिंदी शिकतात. आमिर खानचा ‘दंगल’ (१४३० कोटी) आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ (७९४ कोटी) हे दोन चित्रपट परदेशात सर्वाधिक कमाई करणारे हिंदी चित्रपट आहेत. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानंही ४७३ कोटींची कमाई केली. करोनानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये शाहरुखच्या ‘पठाण’ (३९६ कोटी) आणि ‘जवान’ (३८६ कोटी) तर रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ (२५५ कोटी) या चित्रपटांनी उत्तम कमाई केली होती. आयुषमान खुरानाच्या ‘अंदाधुन’ चित्रपटानं ३६१ तर आमिर खानच्या ‘पीके’ नं २९६ कोटींची कमाई केली. अमेरिका, ब्रिटन, युरोप वगळता इतरही देशांमध्ये आता हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट जपानमध्येही प्रदर्शित झाले आहेत.
हिंदी चित्रपटांना वाढती मागणी !
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी चित्रपट हे आपल्या देशाची ताकद आहेत असं म्हटलं. गेल्या काही वर्षांत जगभरातील विविध देशांमध्ये भारतीयांचं प्रमाण वाढलं असून त्यामुळे आपोआपच बाहेरील देशांमध्ये हिंदी चित्रपट बघण्याचं प्रमाण वाढलं आहे. निर्मात आणि चित्रपट अभ्यासक गिरीश जोहर यांनी सांगितलं, ‘हिंदी चित्रपटांमुळे जगभरात हिंदी भाषेची लोकप्रियता वाढली आहे यात दुमत नाही. सोशल मीडियामुळे हिंदी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. शाहरुख खानच्या चित्रपटांना भारताबाहेरही खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांनाही परदेशात पसंती मिळते. शाहरुखच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या सिनेमांबरोबरच परदेशात रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ नंही चांगली कमाई केली.
हिंदी चित्रपटांमुळे हिंदी भाषेची लोकप्रियता जगभरात वाढलीय. सोशल मीडियाचंही हिंदी भाषेच्या प्रसारात महत्त्वाचं योगदान आहे.
– गिरीश जोहर, निर्माते आणि चित्रपट अभ्यासक
हिंदीत सुपरहिट झालेले दाक्षिणात्य चित्रपट
पुष्पा २ – ८२० कोटी
बाहुबली २ – ५११ कोटी
केजीएफ २- ४३५ कोटी
कल्की – २९४ कोटी
आरआरआर २७४ कोटी
शब्दांकन : देविका जोशी-गोखले