Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिवभोजन केंद्रात गैरप्रकार आढळल्यास कारवाई करा

4

पुणे दि 13: शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित शिवभोजन केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले

शासकीय विश्रामगह येथे श्री.भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षणबाबत पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने,अन्न्धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, परिमंडल अधिकारी गिरीष तावले, प्रशांत खताळ, चांगदेव नागरगोजे आदी उपस्थित होते

. भुजबळ म्हणाले, राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळला तरी तातडीने कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

शिवभोजन केंद्राला जागा बदल करण्याबाबतच्य नियमात शिथिलता देण्याबाबत लवकरण शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे. शिवभोजन केंद्र देताना दिव्यांग तसेच महिला यांना प्राधान्य द्यावे, या माध्यमातून अधिकाधिक गरजू महिलांना रोजगार मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.‌.ई-पॉस मशीनमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील, याबाबत आलेल्या तक्रारी दुर करण्याचा प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले. गोदाम उभारणीचे नियोजन, आधार जोडणी वाढविणे, कल्याणकारी संस्थांचे नियमन, पुणे जिल्ह्याचा आयएसओ उपक्रम आदीबाबत श्री. भुजबळ यांनी आढावा घेतला.

.  

यावेळीपुणे जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.