Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नीरा नरसिंहपूर येथे विकास सार्वजनिक वाचनालयामध

7


नीरा नरसिंहपूर,दि, :२० :- नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथे विकास सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी विद्यमान सरपंच नरहरी काळे, सरपंच चंद्रकांत सरवदे, चित्रपट अभिनेते व ग्रामपंचायत सदस्य नितीन सरवदे, विजय सरवदे, माजी सरपंच जगदीश सुतार,  माजी उप सरपंच विठ्ठल देशमुख, प्रशांत बांधले, उपसरपंच सुनील मोहिते, मगन शिरसागर या सर्वांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी माजी सरपंच नरहरी काळे,  सरपंच चंद्रकांत सरवदे, उपसरपंच सुनील मोहिते,   माजी उपसरपंच विठ्ठल देशमुख, विजय सरवदे, जगदीश सुतार, ग्रामपंचायत सदस्य व चित्रपट अभिनेते नितीन सरवदे, ग्रामपंचायत सदस्य पप्पू गोसावी  विकास वाचनालयाचे संचालक मगन शिरसागर , डॉक्टर अरुण वैद्य ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत बांधले हे सर्वच या जयंतीनिमित्त उपस्थित होते.  

सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आले .विकास वाचनालयाचे कार्यवाह धनंजय दुनाखे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला तसेच विकास वाचनालय संदर्भातील माहिती दिली आणि गावातील सर्व तरुण व सुशिक्षित विद्यार्थ्यांनी वाचनालयाचा लाभ घ्यावा व स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी पुस्तके आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे सांगितले. प्रास्ताविक डॉक्टर वैद्य यांनी केले . शेवटी आभार व्यक्त धनंजय दुनाखे सर यांनी मानले

इंदापूर प्रतिनिधी:- डॉ सिद्धार्थ सरवदे.       


Leave A Reply

Your email address will not be published.