Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

“दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओ वर विजय दरवेळी&#8221

5

नीरा नरसिंहपूर,दि.२७ :-निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील अंगणवाडी शाळेमध्ये पल्स पोलिओ मोहीम २०२२ या पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ अश्विनी चंद्रकांत सरवदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देऊन शुभारंभ करण्यात आला. पोलिओ चा डोस देताना डॉ. सुमित्रा कोकाटे म्हणाल्या की भारत पोलिओमुक्त आहे परंतु काही देशांमध्ये पोलिओ असल्यामुळे तो पुन्हा येऊ शकतो म्हणून आपल्या बालकांच्या संपूर्ण सुरक्षेसाठी पोलिओ डोस द्या व आपल्या बाळाला सुरक्षित ठेवा.आरोग्य सेविका प्रियंका पाटील, आरोग्य सेवक प्रदीप बोडरे ,अश्विनी मिलिंद देवळे आशा सेविका, संगीता बाळासाहेब टेंभुर्णीकर अंगणवाडी सेविका, कल्पना शिवाजी दळवी अंगणवाडी मदतनीस, वर्षा अमोल गोडसे ,धनश्री अक्षय गोडसे, स्वाती सिद्धार्थ सरवदे, कोमल किशोर मोहिते, रेणुका आनंद काकडे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे ,विजय सरवदे अण्णासाहेब काळे, सचिन कदम, नरहरी काळे, नितीन सरवदे, पप्पू गोसावी, प्रशांत बादले पाटील ,आनंद काकडे, दत्ता कोळी हनुमंत काळे , गोरख लोखंडे ,राजेंद्र बळवंतराव, अरुण क्षीरसागर, अतुल घोगरे,बळीराम गलांडे,डॉ.सुमित्रा कोकाटे, डॉ. सिद्धार्थ सरवदे व आलेल्या सर्व बालकांच्या माता व भगिनी उपस्थित होत्या.

निरा प्रतिनिधी :-डाॅ सिद्धार्थ सरवदे

Leave A Reply

Your email address will not be published.