Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.०५ :- पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासने यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. या निवडणुकीत रासने यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप गायकवाड यांचा पराभव केला. रासने यांना 10, तर गायकवाड यांना 6 मते मिळाली. दरम्यान, रासने यांचे अध्यक्षपद पुढील 14 दिवसांसाठी असणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत 28 फेब्रुवारीला संपली होती. तर, महापालिका सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे प्रशासनाने ही निवडणूक घेतली होती. स्थायी समितीत या 14 दिवसांसाठी भाजपने आपल्या सर्व विद्यमान सदस्यांना दिली. तर राष्ट्रवादीने आपले दोन सदस्य बदलले होते. मात्र, स्थायी समितीत सर्वाधिक 10 सदस्य भाजपचेच असल्याने रासने यांचा विजय निश्चित मानला जात होता.
स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व कॉंग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण 16 सदस्य आहेत. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही दगाफटका टाळण्यासाठी भाजपने सर्व सदस्यांना ‘व्हीप’ बजावला होता. तर रासने यांचा विजय निश्चित असल्याने महापालिकेत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. रासने यांच्या निवडीनंतर महापौर मुरलीधर मोहोळ, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी रासने यांचे अभिनंदन केले. नगरसेवक राहूल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, दीपक पोटे, धनराज घोगरे, जयंत भावे, महेश बावळे आदी यावेळी उपस्थित होते.