Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नाशिक,दि.१५ :- नाशिक परिसरातील इगतपुरी शहराजवळील त्रिंगलवाडी हद्दीतील माउंटन शॅडो या नामांकित रिसॉर्टवर पोलिसांनी छापा मारून हुक्का पार्टी उध्वस्त केला.या छापेमारीत दोन महिलांसह 52 तरुणांना ताब्यात घेतलं आहे.दरम्यान, संबंधित 52 जणांना इगतपूरी न्यायालयात हजर केले असता सर्वांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली; तर वेश्याव्यवसायासाठी महिला पुरवणाऱ्या दोन आरोपी महिलांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास इगतपुरी पोलीस करत आहेत.शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर असं गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपी महिलांची नावं असून त्या हुक्का पार्टीत वेश्याव्यवसायासाठी महिला पुरवण्याचं काम करत होत्या. अन्य अटक केलेले 52 तरुण हे रेवती कंपनीच्या हार्डवेअर स्पेअरपार्ट कंपनीचे प्रत्येक राज्यातील होलसेल डिस्ट्रीब्यूटर आहेत. संबंधित सर्वजण 13 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध रिसॉर्ट माउंटशाडो रिसॉर्ट याठिकाणी हुक्का पार्टी करत होते. या अवैध पार्टीची माहिती इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती