Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चतुश्रीगी पोलिसांची चोख कामगिरी – झुंजार

27

पुणे,दि.१६ :- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे दौऱ्यात पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मेरीयट येथे उतरल्याचे समजताच येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या आक्रमक कार्यकर्त्यांनी धडक तर दिली मात्र त्यांना हॉटेल मध्ये घुसू न देता पुणे चतुश्रीगी पोलिसांनी चोख कामगिरी बजावली .यातील अनेकांना पोलीस गाडीत बसवून ताब्यात घेऊन नेण्यात आले तर अनेक जणानां आपापले माघारी या दरम्यान पोलीस दडपशाही करतात असा आरोप करत या कार्यकर्त्यांनी पोलिसांचाही निषेध चालविला होता. अंकुश काकडे , प्रदीप देशमुख, प्रशांत जगताप ,रुपाली पाटील आणि राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज येथे धडकली . महागाईच्या विरोधात प्रचंड नारेबाजी झाली , राष्ट्रवादीचे झेंडे फडकविण्यात येत होते, घरगुती गैस सिलेंडर च्या प्रतीमा हाथी होत्या पण हि सारी नारेबाजी होत असताना पोलिसांनी‌ यांना नारेबाजी करत येथे रोखून धरले आणि नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत बसवून पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.