Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे शहरातील विमानगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक इमदादुला इस्माईल अली (वय 19, रा. आराम) याला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरचा मालक शंतनू सरकार, शमशुद्दीन, जयराम वॅलपुली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नीलम शिंदे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विमाननगरमधील गल्ली क्रमांक तीन मध्ये एका बंगल्यात अमेया स्पा नावाने मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. मसाज सेंटरमधील व्यवस्थापक इमदादुला अलीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून नऊ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपीं विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंढरकर पोलीस अंमलदार मोहिते, अश्विनी केकाण, हनुमंत कांबळे, आण्णा माने यांच्या पथकाने केली आहे.