Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मा.नगरसेवकावर 15 कोटींची फसवणुक केल्याचा पुण्यात

10

पुणे,दि.०८ :- पुण्यात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात कंपनीच्या वतीने व्यवहार करताना कंपनीला पूर्व कल्पना न देता जमिनीची परस्पर विक्री करुन १५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी व मा. नगरसेवकावर पुण्यातील चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले ऊर्फ राजेश पिल्ले (वय ५२, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या मा. नगरसेवकाचे नाव आहे.याबाबत संजयदयानंद ओसरमल (वय ३९, रा. पिंपरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद
(गु. रजि. नं. ३५८/२२) दिली आहे. हा प्रकार चर्‍होली बु येथील जमीनीबाबत ५ फेब्रुवारी २०१९ ते मे २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ब्रम्हाकॉर्प लि. ही रामकुमार अगरवाल यांची कंपनी असून ते संचालक आहे.
त्यांच्यावतीने जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये राजेश पिल्ले हे प्रिंसिपल एजंट (विश्वस्त प्रतिनिधी) म्हणून काम करत होते.
त्याने चर्‍होली येथील ९५ आर ही मिळकत कंपनीचे संचालक रामकुमार अगरवाल यांना कोणतीही पूर्व कल्पना
न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे व धनंजर हनंमत लांडगे (रा. पिंपरी) यांना खरेदी खताने विक्री केली.
ब्रम्हाकॉर्प कंपनीचा विश्वासघात करुन १५ कोटी रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली़ पोलीस उपनिरीक्षक पालवे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.