Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रात्रीच्या वेळी पर्स, मोबाईल हिसकवणा-या आरोपींना केले जेरबंद

7

रात्रीच्या वेळी पर्स, मोबाईल हिसकवणा-या आरोपींना केले जेरबंद

कल्याणीनगर येरवडा परिसरात दि. ११/०७/२०२२ रोजी रात्री फिर्यादी हया मैत्रिणीसोबत मारीगोल्ड सोसायटीजवळून जात असताना दोन अनोळखी इसमांनी पाठीमागून येवून खांदयाला अडकवलेली पर्स व त्यामधील साहित्य जबरदस्तीने हिसकावून घेवून गेले त्याबाबत येरवडा पो स्टे गुर नं ३२५/२०२२ भादवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व पोलीस अंमलदार किरण घुटे, तुषार खराडे व राहुल परदेशी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल हा आदित्य जाधव वापरत असल्याचे समजले. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व तपास पथकातील अंमलदार यांनी संशयीत इसम पळून जात असताना अतिशय शिताफीने त्यास पकडले. त्याला त्याचे नाव पत्ता विचारता अदित्य उर्फ बच्चू भारत जाधव वय २० रा वडगाव शेरी पुणे असे असल्याचे सांगितले.

त्याचेकडे चौकशी करता त्याने त्याचा साथीदार नामे राज महेश कांबळे वय २१ रा लक्ष्मीनगर येरवडा पुणे याचेसोबत सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याप्रमाणे दोघांना दि. ०१/११/२०२२ रोजी अटक करण्यात आली असून त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला २०,५००/- रु किं.चा मोबाईल, पर्स मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांचेकडे सखोल तपास करता त्यांनी येरवडा पो स्टे गु र नं १६७/२०२२ भादवि ३७९.३७ व विमानतळ पो स्टे गु र नं १६६ / २०२२ भादवि ३७९ असे एकूण ३ गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्यांचेकडून ३ गुन्हे उघडकीस आलेले असून ७ मोबाईल, १ व्हेस्पा स्कुटर, १ हिरो डिलक्स मोटारसायकल असा एकूण ३,०९,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री रोहिदास पवार पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ४ श्री किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. उत्तम चक्रे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफौ प्रदिप सुर्वे, पो. अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, कैलास डुकरे, अमजद शेख, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.