Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

प्रेयसीची औंध येथे हत्या करून नंतर स्वत:ला संपवल

8

पुणे,दि.१०:- पुण्यातील औंध परिसरातील सिध्दार्थ नगर येथे फेस वन येथील प्रेम प्रकरणातून २६ वर्षीय तरुणीचा खून करून प्रतिक ढमाले यांनी स्वतः देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मुळशी येथील टाटा डॅम जवळ पळशे गाव येथे आज सकाळी ११ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला आहे. काल (९ नोव्हेंबर) प्रतिक ढमालेने २६ वर्षीय तरुणीचा राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधे धारदार शस्त्राने खून केला होता. प्रतिक आणि संबंधित तरुणी मागील पाच वर्षांपासून एकमेकांना प्रेम संबंध होते व दोघांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या लग्नाची बोलणीही सुरु होती. मात्र मुलीकडच्या नातेवाईकांनी लग्नास नकार दिल्याने प्रतिक अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने या मुलीला सोसायटीच्या पार्किंगमध्ये भेटण्याचे कारण देऊन बोलावले आणि गाडी पार्किंग करत असताना  धारदार शस्त्रांच्या सहाय्याने तिचा खून केला. हत्येनंतर प्रतिक ढमाले फरार झाला होता. मात्र त्यानेही आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.
वाद विकोपाला गेला अन् तरुणाने थेट खून केला बुधवारी दुपारी दोघेजण भेटले होते. त्यावेळी दोघांमध्ये प्रेम प्रकरणावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. दोघांनीही एकमेकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र वाद एवढा वाढला की तरुणाला राग अनावर झाला. रागाच्या भरात तरुणाने खिशात असलेलं धारदार शस्त्र काढलं आणि तरुणीच्या अंगावर धावून गेला. तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी अपयशी ठरली. यात तरुणीच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या. प्रेयसी गंभीर जखमी झाल्याचं लक्षात येताच आरोपी प्रियकरानं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर उपस्थितांची तिथे गर्दी झाली, गर्दीमधील काही लोकांनी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.