Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.०७:- पुण्यातील शिवाजीनगर परिसरात बेकायदेशीरपणे मोकळया जागेत काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १० जणांनान व एक पाहिजे आरोपी ताब्यात घेऊन
५० हजार ८४० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरूवार (दि.१७) रोजी केली.
शिवाजीनगर हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर कल्याण जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ५० हजार ८४० रुपय किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ११ जणांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ताब्यात घेण्यात आलेल्या ११ जणांना पुढील कारवाईसाठी शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई सदरची कारवाई.पोलीस आयुक्त, पुणे शहर,अमिताभ गुप्ता. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,संदिप कर्णिक.रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सहा. पो. निरी. अश्विनी पाटील, सहा.पो.निरी. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदिप कोळगे व पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.