Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.१३:- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात बंदची हाक दिली होती.व आज मूक मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होते. व आज सकाळी निघालेल्या मूक मोर्चात अनेक संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.खासदार छत्रपती उदयनराजे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, दीपक मानकर, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, मोहन जोशी, आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, संगीत तिवारी, अंकुश काकडे, रुपाली पाटील, अजित दरेकर, संजय बालगुडे, संतोष शिंदे, राजेंद्र कुंजीर, विकास पासलकर, चंद्रकांत मोकाट हे सगळे या मूक मोर्चात सहभागी झाले होते.आज सकाळी ११ वाजता उदयनराजे यांच्या हस्ते डेक्कन जिमखाना येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मूक मोर्चास प्रारंभ झाला.डेक्कन जिमखाना, टिळक चौक मार्गे लक्ष्मी रस्त्याने शगुण चौक, नगरकर तालीम चौक, बेलबाग चौक मार्गे लाल महालजवळ आला.लाल महालात मोर्चाचं रुपांतर सभेत होणार आहे. यात अनेक प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहेत.या सगळ्या मोर्चासाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. प्रत्येक चौकात पोलीसांचा ताफा तैनात होता. पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंद दरम्यान संपूर्ण पुणे शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता.राज्यपालांना हटवा, असं लिहिलेलं फलक हातात घेत अनेक संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.