Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दलित पँथर ही आग आहे, पिढ्यानपिढ्या जळत राहणार; डॉ. सूरज येंगडे यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

5

औरंगाबाद :दलित पँथर ही संघटना एक आग असून ती सहज विझणारी नाही, तर ती पिढ्यानपिढ्या जळत राहणारी आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सूरज येंगडे यांनी केले आहे. दलित पँथरच्या पूर्वीचा काळ हा साहित्य विद्रोहाचा काळ आहे. साहित्यातून विचार तयार झाला, विचारातून नवी ऊर्जा तयार झाली आणि नव्या ऊर्जेला पर्याय म्हणून पॅंथरची निर्मिती झाली. त्यानंतर या संघटनेने चार वर्ष मोठ्या ताकदीने काम केलं. पॅंथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले. ज्या ठिकाणी अन्याय,अत्याचार व्हायचे, त्या ठिकाणी पँथर जाणार हे कळताच तेव्हा प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा. असा धाक पँथरचा होता. मात्र वैचारिक मतभेदामुळे पँथर बरखास्त करण्यात आली. यामध्ये विरोधकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा होता, असे अभ्यासपूर्ण विश्लेषण डॉ. येंगडे यांनी केले आहे.

दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात डॉ. एंगडे आपले विचार मांडत होते. या यावेळी मार्गदर्शक म्हणून संशोधक डॉ. सुरज येंगडे यांच्यासह जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल, पोलीस अधिकारी प्रवीण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार राहुल शेवाळे अडचणीत येणार?; उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे ‘त्या’ प्रकरणी SIT मार्फत चौकशीचे निर्देश
‘दलित पँथरचे आंदोलन समाजसुधारणेसाठीच’

उपस्थितांना संबोधिक करताना डॉ, येंगडे पुढे म्हणाले की, पँथरच्या माध्यमातून तुमच्या पूर्वजांनी विषमतावादी लोकांच्या विरोधात लढे उभारले होतो. ते समाजाला सुधरवण्याचे आंदोलन होते. तुम्ही जेव्हा समाजाला सुधरवता तेव्हा तुम्ही देश सुधरवण्याचेच काम करत असता. यासाठी देश सुधरवणाऱ्या दलित पँथरचे पन्नासावे वर्ष अभिमानाने साजरे करणं गरजेचं आहे.

तंबाखू, गुटखा यासारख्या पदार्थांची जाहिरात करणारे आजच्या तरुण पिढीचे आदर्श कसे असू शकतात?, असा सवाल उपस्थित करत डॉ. येंगडे पुढे म्हणाले की, आजच्या चित्रपटांचा खरेपणा गेला आहे. इतर देशातील चित्रपटांचे अनुकरण करून इथले चित्रपट तयार केले जातात. हे चित्रपट तयार करणाऱ्यांनी ठरवलंय की तुम्ही नवीन काही बघू शकतं नाही. यामुळे आजच्या तरुणाचे आदर्श हे व्यवस्थेविरुद्ध लढून स्वाभिमानाने जगायला लावणारे असावेत.

रिया चक्रवर्तीला A U नावाने आले ४४ कॉल?; खासदार शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, आदित्यांचा पलटवार
‘आंदोलनातून घरी पाठवण्याचा अर्थ कळाला’

डॉ. सुरज येंगडे म्हणाले, महाविद्यालयात असताना आमच्या परिसरात एक आंदोलन होत होत. त्यात मी सहभागी झालो. मात्र आमच्या परिसरातील लोकांनी मला त्या ठिकाणाहून घरी पाठवून दिलं. त्यावेळी मला अस वाटलं की मी तरुण आहे. आंदोलनात गरज पडली तर दगडही मारू शकतो, मग मला घरी का पाठवलं. मात्र मला उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं होतं आणि त्यासाठी पासपोर्ट काढायची गरज पडली. त्या वेळी मोठ्या लोकांनी मला घरी का पाठवलं त्याचं खरं कारण कळलं.

या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनीही आपले विचार मांडले. मंडल म्हणाले की, भारतीय दलित पँथरने कोट्यवधी लोकांना न्याय मिळवून दिला. एखादी चळवळीचे लगेचच परिणाम पाहायला मिळतीलच असे नाही. चळवळ पूर्ण झाल्यानंतरही परिणाम पाहायला मिळत असतात. सध्याच्या परिस्थितीत आपण आपल्या स्वप्नांची उंची वाढवणं गरजेच आहे. सध्याची परिस्थिती यासाठी अनुकूल नसेलही. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडे सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दलित पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ आहे. या चळवळीने समाजातील पीडितांना न्याय मिळवून दिला.

फडणवीसांना बालेकिल्ल्यातच धक्का; दत्तक घेतलेल्या गावात काँग्रेस-राकाँ आघाडीची दुसऱ्यांदा सत्ता
ह्यावेळी राहुल प्रधान, सचिन निकम,सिद्धार्थ शिंगारे,गुणरत्न सोनवणे,अतुल कांबळे, सिद्धार्थ मोरे,राहुल खंडागळे,प्रशांत बोराडे, भीमराव वाघमारे,भागवत चोपडे संदिप तूपसमुद्रे,जयेश पठाडे,राहुल वडमारे,आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतीश पट्टेकर, सूत्रसंचालन राजेंद्र गोणारकर यांनी केले.

दुसऱ्या सत्रात लोकनाथ यशवंत,शेषराव धांडे,वनश्री वनकर यांनी कविता सादर केल्या. तसेच महिला चळवळीवरील परिसंवादात डॉ. सुनिता सावरकर, योगिनी पगारे, वनश्री वनकर, डॉ.सोनाली म्हस्के यांनी आपले विचार मांडले.

या बरोबरच सुशीला खडसे, प्राचार्य यशवंत खडसे, अमोल झोडपे, के. व्ही. मोरे, डॉ. प्रमोद दुथडे, डॉ. अविनाश सोनवणे, विलास जगताप, प्रा.सुरेश शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सायंकाळी विपीन तातड यांनी ‘वंदन माह्या भीमा’, महिलांचे प्रश्न मांडणारे ‘हॅपी वुमन्स दे, घे ना लॉकडाऊन’ हे रॅप सादर करून महोत्सवात रंग भरले. कैलास खानजोडे यांनी साकारलेली सुंदर रंगोळी चित्र उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.