Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कौटुंबिक वादातून सासू – सासऱ्यांनी पेट्रोल टाकून जावयाला पेटवलं

7

पुणे,दि.०१:-पती -पत्नीतील वादामुळे ते चार वर्षे पासून वेगळे रहात असून त्या कारणावरुन सासु सासर्‍यांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार चंदननगर परिसरात समोर आला आहे. त्या घटनेत जावई पोट, पाठ, गळा, छाती व दोन्ही हात भाजले आहे.

याबाबत लखन बाजीराव काळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. ही घटना दि३० रोजी सायंकाळी पाच वाजता खराडीमधील रिलायन्स मॉलकडून खराडी गावाकडे जाणार्‍या रोडवर घडली आहे.
चंदननगर पोलिसांनी सासरे रजित ऊर्फ गेंड्या याजिंदर भोसले , सासु बासुंदी रंजित ऊर्फ गेंड्या भोसले, साडु अलताफ विजय काळे, पत्नी पेडम लखन काळे, मेहुणा कावकर रंजित ऊर्फ गेंड्या भोसले यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन काळे व त्याची पत्नी पेडम यांच्यात कौटुंबिक वाद आहे. त्यामुळे त्याची पत्नी, मुलगा व मुलगी हे फिर्यादी सोबत रहात नाही. त्यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता.
शुक्रवारी सायंकाळी लखन हे एका झाडाखाली बसले असताना त्याचे सासु सासरे व इतर तेथे आले. पत्नीस नांदवित नसल्याच्या कारणावरुन त्यांनी लखन यांना मारहाण केली.
सासु सासरे यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमधील पेट्रोल लखन यांच्या अंगावर टाकली. सासुने काडी पेटवून त्यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यात लखन यांचे पोट, पाठ, गळा, छाती व दोन्ही हात भाजले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.पुढिल तपास पो.उप.निरी.जगन्नाथ जानकर करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.